सुप्पर डुप्पर चित्रपटांची रांग लावणाऱ्या विक्रम भट्टच्या आयुष्यात ‘त्या’ आल्या, अन् गोष्ट सुसाईडपर्यंत पोहचली


बॉलीवूडमध्ये हॉरर सोबतच बोल्डनेसचा तडका लावणाऱ्या विक्रम भट्ट यांचा आज वाढदिवस. २७ जानेवारी १९६९ ला विक्रम भट्ट यांचा मुंबईमध्ये जन्म झाला. विक्रम यांच्या घरात सुरुवातीपासूनच चित्रपटाचे वातावरण होते. त्यांचे आजोबा विजय भट्ट हे इंडस्ट्रीमधल्या मोठ्या लोकांपैकी एक तर वडील प्रवीण भट्टदेखील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते.

विक्रम यांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासून काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये अनेक एक से बढकर हिट सिनेमे दिले. विक्रम यांच्या प्रोफेशनल लाईफसोबत त्यांची पर्सनल लाईफ देखील प्रचंड गाजली.

आज विक्रम भट्ट यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या जीवनातील काही माहित नसलेल्या घटना.

विक्रम यांनी त्यांच्या कॉलेजच्या मैत्रिणीसोबत अदितीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी देखील झाली. मात्र असे असूनही, विक्रम यांचे सुश्मिता सेन सोबत नाव जोडले गेले. विक्रम मिस युनिव्हर्स असलेल्या सुश्मिताच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्या दोघांच्या अफेयरच्या चर्चांमुळे विक्रम यांचे लग्न मोडले गेले. लग्न मोडल्यामुळे विक्रम खूप निराश झाले होते. त्यावेळी त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील विचार केला होता.

यासर्व घटनांना सुष्मिताला जबाबदार धरले गेले. मात्र त्यांनी या आरोपांना साफ खोडून काढले. त्यांना सांगितले की, सुश्मिता सेनवर त्यांचे प्रेम होते पण तरीही त्यांना त्यांचे लग्न मोडू द्यायचे नव्हते, मात्र लग्न मोडल्याने ते खूपच उदास झाले होते.

त्यानंतर विक्रम यांचे नाव अमिषा पटेल सोबत देखील जोडले गेले. २००२ साली आलेल्या आप मुझे अच्छे लगने लगे चित्रपटाच्या वेळेला या दोघांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र ५ वर्षानंतर हे नाते देखील संपुष्टात आले.

विक्रम यांच्या चित्रपटांना प्रचंड यश मिळाले किंबहुना मिळते,पण त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेमात आणि लग्नात अपेक्षित यश मिळाले नाही.

विक्रम भट्ट यांनी मदहोश, गुन्हेगार, फरेब, बंबई का बाबू, आप मुझे अच्छे लगने लगे, आवारा पागल दीवाना, आँखे, फियर, स्पीड, ऐतबार, शापित, हॉन्टेड, राज 3 डी, डेंजरस इश्क, मिस्टर एक्स आदी हिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.