टेलिव्हिजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या शुभांगी अत्रेच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ आले आहे. शुभांगीने नुकतेच जाहीर केले आहे की तिने आणि तिच्या नवऱ्याने लग्नाच्या १९ वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यात असणाऱ्या वैयक्तिक वादांमुळे त्यांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला असल्याचे देखील तिने स्पष्ट केले. मागे एका दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, तिच्या नवऱ्याने तिला नेहमीच पाठिंबा दिला आणि या क्षेत्रात करियर बनवण्यासाठी मदत केली. मात्र आता समीकरणं बदलली आहे. शुभांगीने दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे.
शुभांगी मुलाखतीमध्ये म्हणाली, “मागील वर्षभरापासून आम्ही दोघे एकत्र नाही. आम्ही दोघेही वेगवेगळे राहत आहोत. पियुष आणि मी आम्ही दोघांनी मिळून आमचे लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. मात्र लग्नाचे नाते हे सन्मान, विश्वास आणि मैत्रीवरच टिकून असते. शिवाय आमच्यात असणाऱ्या मतभेदांवर कोणताच उपाय निघत नव्हता. म्हणूनच सामंजस्याने आम्ही दोघांनी एकमेकांना अंतर देणं, वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं, करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. हा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी नेहमीच माझ्या कुटुंबाला पहिले प्राधान्य दिले. आपल्या कुटुंबातील सदस्य नेहमीच आपल्या आजूबाजूला असावेत असे प्रत्येकालाच वाटते. खूप वर्षांचे नाते जेव्हा तुटते तेव्हा मानसिक आणि भावनिक त्रास होतो. पण आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि मीही या निर्णयाशी सहमत आहे”.
View this post on Instagram
दरम्यान शुभांगी आणि पियुष यांनी २००३ साली इंदोर येथे लग्न केले होते. त्यांना ‘आशी’ नावाची एक मुलगी देखील आहे. तिचा नवरा पियुष हा डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करतो. त्या दोघांनी ठरवले आहे की, त्यांच्या १८ वर्षाच्या मुलींसाठी ते कोणताच तेढ मनात ठेवणार नाही. कारण मुलीला आई आणि बाबा दोघांचेही प्रेम मिळाले पाहिजे. सध्या आशी तिच्या आईसोबत राहत असून, पियुष दर रविवारी तिला भेटायला येतो, असे तिने सांगितले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आजारी असलेल्या सुलोचना दीदींच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडवर शोककळा