Sunday, March 16, 2025
Home अन्य चाहत्यांसाठी चकित करणारी बातमी! शुभांगी नाही तर आता ‘ही’ असणार नवीन अंगुरी भाबी

चाहत्यांसाठी चकित करणारी बातमी! शुभांगी नाही तर आता ‘ही’ असणार नवीन अंगुरी भाबी

ऍंड टीव्हीचा सर्वात आवडता शो ‘भाबीजी घर पर हैं’ने नेहमीच आपल्या मजेदार कथांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. लवकरच आता प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज मिळणार आहे. कारण तिवारी जीच्या(रोहिताश्व गौड) आयुष्यात नवीन अंगूरी भाबीची एन्ट्री होणार आहे. आता अंगूरी भाबीची भूमिका करणारी शुभांगी हा शो सोडत आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण तसं काहीही नाही.

खरं तर, आगामी भागात अंगूरी भाबीची भूमिका दुसरं कोणी नाही, तर अनोखे लाल सक्सेना साकारणार आहे. वेगवेगळे अनेक पात्रं साकारल्यानंतर, सानंद वर्मा (अनोखे लाल सक्सेना) आता बबली अंगूरी भाबीच्या भूमिकेत दिसणार आहे. (bhabi ji ghar par hain this actor to replace shubhangi atre as angoori bhabi)

सध्याच्या एपिसोड्समध्ये, अंगूरी भाबी तिवारी जीसोबत झालेल्या मोठ्या भांडणानंतर घर सोडून गेली आहे आणि ती विभूतीच्या घरी राहते. तिवारीजींना बरे वाटावे म्हणून सक्सेना (सानंद वर्मा) अंगूरी भाबीची वेषभूषा करण्याचा निर्णय घेतो. अंगूरी भाबीचा लूक करण्याण्यासाठी तो तिची सुंदर साडी नेसतो, लांब केस घालतो आणि मिशा कापून अंगूरी भाबीप्रमाणे नाकात नोज पिन घालतो.

सानंदचा अंगूरी भाभी बनण्याचा अनुभव
अंगूरी भाबी बनण्याचा अनुभव सांगताना, सानंद वर्मा म्हणाला, “मला अंगूरी भाबीचे सुंदर रूप नेहमीच आवडते. ती ज्या प्रकारची साडी आणि दागिने घालते त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसते. एक कलाकार या नात्याने मी नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्यास आणि नवीन लूक करण्यास उत्सुक असतो. मला या ट्रॅकसाठी शूटिंग करताना खूप मजा आली आणि आशा आहे की हे पात्र साकारताना मला जितका आनंद वाटला तितकाच प्रेक्षकांनाही तो पाहण्यात आवडेल.”

काय म्हणाली शुभांगी
सक्सेनाच्या अंगूरी लूकवर प्रतिक्रिया देताना शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी) म्हणाली, “सानंद जींनी अंगूरी भाभीची भूमिका पडद्यावर ज्या प्रकारे साकारली आहे, ते मला खूप आवडले. त्यांनी हा भाग ज्या प्रकारे शूट केला आहे, त्यामुळे या शोची मनोरंजनाची पातळी आणखी वाढली आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही ही नवीन कथा खूप आवडेल.” आता नव्या अंगुरी भाबीला पाहून प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा