मेहनत, चिकाटी, संघर्ष यांच्या बळावर प्रत्येक व्यक्ती तिचे ठरवलेले ध्येय नक्कीच गाठू शकते. याची अनेक उदाहरणं सिनेसृष्टीत आपल्याला पाहायला मिळतील. अनेक कलाकार जेव्हा अभिनय करण्यासाठी आले, तेव्हा त्यांना एकवेळ खायला मिळत नव्हते, मात्र प्रयत्न, मेहनत यांच्या जोरावर आज हे कलाकार यशस्वी झाले असून, त्यांनी बक्कळ पैसा देखील कमावण्यास सुरुवात केली आहे. आज जेव्हा ते कलाकार मागे वळून बघत असतील तेव्हा त्यांना स्वतःचा किती अभिमान आणि समाधान वाटत असेल.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकरांना नेहमीच दुय्यम स्थान मिळाल्याचे पाहायला मिळते. मात्र या क्षेत्रात काम करणारे कलाकार देखील बक्कळ पैसा कमावताना दिसतात. असेच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जाणारे रोहिताश गौड अर्थात तुमचे आमचे भाभीजी घर पे हैं मधील मनमोहन तिवारी. रोहिताश यांनी मोठं संघर्ष करून हे आभाळाएवढे यश मिळवले आहे. आज त्याची ओळख टीव्हीमधील सर्वात जास्त फी घेणाऱ्या कलाकारांमध्ये होते.
भाभीजी घर पे हैं मालिकेतील मनमोहन तिवारी हे नेहमीच त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या कॉमेडीचा परफेक्ट टायमिंग लोकांना नेहमीच हसवताना दिसते. शोमध्ये एका व्यावसायिकाची भूमिका साकारणारे मनमोहन तिवारी त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील पक्के बिजनेसमॅन आहेत. रोहिताश हे या शोच्या माध्यमातून अमाप कमाई करतात.
मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश गौड यांनी त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून सर्वांचे मनं जिंकताना दिसत आहे. रोहिताश यांनी २००१ साली या मनोरंजनाच्या दुनियेत पाऊल टाकले. चित्रपटांसोबतच टीव्ही इंडस्ट्रीदेखील गाजवताना दिसत आहे. आज या लेखातून जाणून घेऊया रोहिताश गौड यांच्या कमाईबद्दल आणि त्यांच्या शोच्या प्रत्येक भागाच्या फीबद्दल. जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मनमोहन तिवारी यांची भूमिका साकारून तुफान लोकप्रिय झालेले रोहिताश हे या शोच्या निर्मात्यांकडून बक्कळ फी घेतात. एका भागासाठी रोहिताश तब्ब्ल ६०००० हजार रुपये इति रक्कम चार्ज करतात.
टीव्हीवर किंवा या शोमध्ये ते भलेही एका खडूस व्यावसायिकाची भूमिका साकारत असले तरी खऱ्या आयुष्यात ते कोट्यवधी संपत्तीचे मालक आहे. त्यांच्याकडे आलिशान घरासोबतच, अनेक आलिशान गाड्या देखील आहे. मात्र असे असूनही त्यांचे पाय ते कायम जमिनीवरच ठेवतात. त्यांना त्यांच्या यशाचा अजिबात गर्व नाही. सोशल मीडियावर ते सतत सक्रिय राहून फॅन्सच्या संपर्कात असतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- जॉन अब्राहमला भूतकाळातील चुकांचा पश्चाताप, म्हणाला ‘एक चांगला जोडीदार आणि माणूस बनू शकलो असतो’
- BIRTHDAY SPECIAL : राधिका रावने इंडी पॉपला दिले नवे नाव, रशियाच्या संकटावर बनवला चित्रपट
- आमिर खानने घेतला चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय, कारण जाणून किरण राव झाली भावुक