Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला ३३ वर्ष जुना फोटो म्हणाली, ‘माझा विश्वास बसत नाही…

‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला ३३ वर्ष जुना फोटो म्हणाली, ‘माझा विश्वास बसत नाही…

‘मैंने प्यार किया’ चित्रपटातून एका रात्रीत तुफान प्रसिद्ध झालेली बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. भाग्यश्री जरी चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती आजपर्यंत सगळ्यांच्याच मनावर राज्य करत आली आहे. सध्या भाग्यश्री ती स्टार प्लसवरील स्मार्ट जोडी या कार्यक्रमात दिसत आहे. या शोमध्ये तिने तिच्या आयुष्यातील एक मोठा खुलासा केला आहे. नुकतेच तिने तिचे दोन फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. या शोमध्ये आल्यानंतर तिने तिच्या चाहत्यांसमोर आणि संपूर्ण जगासमोर खूप मोठा खुलासा केला आहे. सगळ्यांनाच माहित आहे की, भाग्यश्रीने मैंने प्यार किया सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच लग्न केले आणि बॉलीवूडला रामराम ठोकला. तिची लव्हस्टोरी आणि लग्नाची स्टोरी सर्वांनाच माहित आहे. या शोमध्ये भाग्यश्रीने तिच्या लग्नाशीच संबंधित एक किस्सा शेअर केला आहे.

तिच्या लग्नामध्ये तिच्या नातेसंबधातील कोणीही आले नव्हते फक्त ती आणि तिचे पती लग्नामध्ये सहभागी होते. त्याचबरोबर या शोमध्ये ती आणि तिचे पती हिमालय परत एकदा लग्नबंधानात अडकले. तिचे चाहते तर तिचे हे लग्न बघण्यासाठी खूप उत्सुक होते. ती ही या क्षणी खूप आनंदी दिसत होती. तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवरती दोन फोटो शेअर केले आहेत.

तिचा पहिला फोटो ३३ वर्षापुर्वीचा असून, यात ती आणि तिचा नवरा हिमालय दोघे मंदिरात लग्न करताना दिसत आहे. या फोटोतून तिने तिच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. तर तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ते दोघे या शोच्या सेटवरती परत एकदा लग्नबंधनात अडकत आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की, ३३ वर्षापुर्वी आम्ही जे काही केले ते परत करत आहोत. आमच्या जीवनातील महत्वपूर्ण दिवस परत एकदा जगत आहोत.” तिचा पती हिमालयने स्मार्ट जोडी या शोमध्ये पुन्हा लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या शोमध्ये तिने हेही सांगितले की, “आम्ही पळून जाऊन लग्न केले नव्हते, काही लोकांनी या अफवा पसरवल्या होत्या.” या दोघांना आता अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी ही दोन मुले आहेत.

हेही वाचा 

हे देखील वाचा