मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच अधिक चर्चेत येते. तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भाग्यश्री खासकरून तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने एक फोटो शेअर केला आहे. तिला या अंदाजात बघून चाहते वेडे झाले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
तिच्या या फोटोवर एक नजर टाकली, की तुम्ही सुद्धा तिचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाहीत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये भाग्यश्रीची हॉटनेस पाहायला मिळत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, तिने सिल्व्हर रंगाचा प्लेन गाऊन घातला आहे, जो बऱ्यापैकी बोल्ड आहे. सोबतच तिने यावर केसांचे हलके कर्ल्स करून मोकळे सोडले आहेत. यात अभिनेत्रीने ज्या प्रकारे फोटोसाठी पोझ दिली आहे, तो अंदाज कोणालाही घायाळ करण्यासाठी पुरेसा आहे. एकंदरीत भाग्यश्रीने पुन्हा सिद्ध केलं आहे की, बोल्ड अभिनेत्रीमध्ये तिला नंबर टॉपलाच लागतो. (bhagyashree mote shared her hot photo on social media)
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “तुम्ही हरवलात का?”. चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कमेंट्सच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या कौतुकाचे पूल बांधले जातायत. तसेच फोटोवर आतापर्यंत ३३ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही भाग्यश्रीने बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केले आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?