Tuesday, July 9, 2024

‘नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः’, नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून भाग्यश्री मोटेने शेअर केला पारंपारिक साज

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच अधिक चर्चेत येते. तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भाग्यश्री खासकरून तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र अलीकडे ती पारंपारिक अंदाजात दिसली. तिला या अंदाजात बघून चाहते वेडे झाले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

तुम्ही तिच्या या फोटोवर एक नजर टाकली, की तुम्ही सुद्धा तिचे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाहीत. नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या फोटोमध्ये केशरी रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. सोबतच तिने दागिन्यांसह हा पारंपारिक लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्री ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देत आहे, तो अंदाज कोणालाही घायाळ करण्यासाठी पुरेसा आहे. (bhagyashree mote shared her traditional look on navaratri)

या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, “या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” असं लिहिलं आहे. तिच्या परिपूर्ण लूकला हे साजेसं कॅप्शनही चाहत्यांकडून पसंत केलं जात आहे. चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच फोटोला आतापर्यंत १७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही भाग्यश्रीने बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केले आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा