मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हटलं की, भाग्यश्री मोटेचे नाव लक्षात येते. ती सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आहे. ती सोशल मीडिया सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोने ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. याशिवाय तिचे फोटो चाहत्यांना पुरते वेडे करून सोडतात. ती आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना अक्षरशः घायाळ करते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
नुकताच भाग्यश्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, जो बघता बघताच व्हायरल झाला. या फोटोमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे. यात तिची टोन्ड बॉडी आणि फिटनेस तुम्हाला सहज पाहायला मिळेल. यात तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. शिवाय ती भिंतीजवळ उभी राहून फोटोसाठी पोझ देत आहे.
हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय ‘फिलिंग एकदम कडक!’. तिच्या फोटोसोबतच हे लक्षवेधी कॅप्शनही चर्चेत आलं आहे. या फोटोवर कमेंट करून चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहे. तसेच अल्पावधीतच या फोटोवर २० हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
भाग्यश्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘देवो के देव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ या हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. तर ‘देवयानी’, ‘प्रेम हे’, ‘देवा श्री गणेशा’ या मराठी मालिकेमध्ये देखील तिने काम केले आहे. याशिवाय ‘काय रे रास्कला’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. अभिनेत्रीने ‘चिकाटी गडीलो चिथाकोतूडू’ या तेलगू चित्रपटातही काम केले आहे. आता भाग्यश्रीचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतील, यात शंकाच नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक
-‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत