मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री मोटे. ती सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंनी ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. याशिवाय ती चाहत्यांना नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्ट्स किंवा नवीन अपडेटबद्दल माहिती देत असते.
नुकतंच अभिनेत्रीने एक फोटो शेअर करत, चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. होय, ही बातमी आनंदाची आहे, कारण माध्यमातील वृत्तानुसार भाग्यश्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वास्तविक भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून तुमच्या लक्षात येईल की, अभिनेत्री येत्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.
https://www.instagram.com/p/CPnBUgjHDRJ/?utm_source=ig_web_copy_link
भाग्यश्री हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोरोना महामारीमुळे चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचे भाग्यश्रीने सांगितले. चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “हार्दिक गज्जर यांच्या ‘रावण लीला’ चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाची कथा खूप मनोरंजक आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली आहे.”
भाग्यश्री ‘देवो के देव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ या हिंदी, तर ‘देवयानी’, ‘प्रेम हे’, ‘देवा श्री गणेशा’ या मराठी मालिकेमध्ये दिसली आहे. याशिवाय ‘काय रे रास्कला’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. अभिनेत्रीने ‘चिकाटी गडीलो चिथाकोतूडू’ या तेलगू चित्रपटातही काम केले आहे. आता भाग्यश्रीचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतील, यात शंकाच नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…