‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या भारत गणेशपुरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारत गणेशपुरे यांच्या आईचे निधन झाले आहे. भारत आणि मनिष गणेशपुरे या दोघं भावंडांची आई असणाऱ्या श्रीमती. मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे निधन झाले. ०९ मार्च २०२३ रोजी पहाटे वृद्धापकाळाने त्यांनी अमरावती येथे अखेरचा श्वास घेतला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ९ मार्च रोजीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. भारत यांचे बंधू असणाऱ्या मनीष यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मनीष यांच्या त्याच घरातून रहाटगाव स्मशानभूमीकरता संध्याकाळी अंत्ययात्रा निघणार आहे.
दरम्यान मनोरमाबाई यांना एकूण चार अपत्ये, त्यांच्यापैकी एक मुलगा आणि मुलीचे आधीच निधन झाले. आता मनोरमबाई यांच्या पश्चात भारत आणि मनीष ही दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारत यांच्या आईने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या या इच्छेनुसार अमरावती याठिकाणी असणाऱ्या दिशा फाउंडेशनने त्यांच्या नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
तत्पूर्वी भारत गणेशपुरे यांनी अनेकदा त्यांच्या आईचे चला हवा येऊ द्या मध्ये नाव घेतले होते. काही शोला त्या स्वतः देखील उपस्थित होत्या. भारत यांच्यावर आलेल्या या दुःखात मनोरंजनविश्वातील आणि चला हवा येऊ द्या मधील त्याच्या सहकार्यांनी त्याला पाठिंबा देत सांत्वना व्यक्त केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण