Monday, July 1, 2024

प्रवाशांनी वडिलांवर केलेली चिडचिड पाहून भरत जाधवने घेतला होता ‘हा’ मोठा निर्णय

मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी मोठ्या संघर्षाने, मेहनतीने आणि कष्टाने त्यांचे करियर उभे केले आहे. त्यामुळे त्या कलाकारांना त्यांच्या कष्टाची आणि इतरांच्या कष्टाची चांगलीच जाणीव आहे. सोबतच त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाची देखील किंमत आहे. अशातच सही अभिनेता अशी ओळख असणाऱ्या भरत जाधवच्या देखील अशाच कलाकारांच्या यादीत समावेश आहे. भरतच्या मनात त्याच्या आईवडिलांबद्दल असलेले प्रेम आणि आदर सर्वश्रुत आहे. अनेकदा तो त्यांच्याबद्दल भरभरून बोलताना दिसतो. भरतच्या वडिलांनी मुंबईमध्ये टॅक्सी चालवत कुटुंबाचा गाडा चालवला आहे. त्यांच्या वडिलांना एकदा टॅक्सी चालवताना त्यांच्या मुलाच्या लोकप्रियतेचा एक अनुभव आला होता. हाच एक किस्सा भरतने एकदा मुलाखतीमध्ये सांगितला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

भरत जाधव किस्सा सांगताना म्हणाला की, “माझे वडील टॅक्सी चालवता असताना एकदा दादरला शिवाजी मंदिरमध्ये माझ्या नाटकाचा प्रयोग होता. त्या दिवशी माझ्या वडिलांच्या टॅक्सीमध्ये काही प्रवासी बसले होते, ज्यांना शिवाजी मंदिरातच माझे नाटक बघायला यायचे होते. याची माझ्या वडिलांना कल्पना नव्हती. त्या दिवशी खूप ट्रॅफिक होते आणि वडिलांची टॅक्सी ट्रॅफिकमध्ये अडकली. खूप वेळ जायला लागला तेव्हा त्या प्रवाशांनी माझ्या वडिलांवर चिडचिड केली. नाटकाची सुरु होऊ नये म्हणून ते माझ्या वडिलांशी रागाने बोलत होते. त्यांच्या बोलण्यावरून माझ्या वडिलांच्या लक्षात आले की, ते माझ्याच नाटकाचा प्रयोग पाहायला जात आहे. प्रवाशांची होणारी चिडचिड बघून वडिलांना राग नाही आला तर उलट त्यांना खूप अभिमान वाटलं होता.”

पुढे भरत म्हणाला, “प्रयोग संपल्यावर मी रात्री घरी गेलो तेव्हा वडिलांनी मला विचारले शिवाजी मंदिरला तुझाच प्रयोग होता का आज? मी त्यांना हो म्हटले. तेव्हा त्यांनी मला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. ते सांगताना त्यांच्या बोलण्यात मला त्या प्रवाशांवर राग अजिबात जाणवला नाही उलट माझे कौतुक दिसले. मी ती घटना ऐकून नाराज झालो आणि त्यांना म्हणालो, तुम्ही यापुढे टॅक्सी चालवायची नाही. त्यांनी ते मान्य केले, पण टॅक्सी विकली नाही. त्यांना माहित होते की हे क्षेत्र भरवशाचे नाही. म्हणून त्यांनी त्यांची टॅक्सी विकली नाही. मी काही महिन्यांनी स्थिर झालो आणि मग त्यांनी टॅक्सी विकली.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

परिणीती आणि राघव चड्ढा यांनी घेतला आयपीएल सामन्याचा आनंद; स्टेडियममध्ये घुमला ‘परिणीती भाभी’चा नाद, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा