Monday, July 1, 2024

विजय चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त भरत जाधवची भावुक पोस्ट; म्हणाला, ‘ज्याप्रमाणे बाप आपल्या मुलाला…’

काही कलाकार असे असतात, ते आज आपल्यात नसले, तरीही त्यांच्या कामाचा सुगंध आजही आपल्यात दरवळत असतो. असेच एक दिवंगत अभिनेते म्हणजे विजय चव्हाण. अनेक नाटक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात सोडणारे विजय चव्हाण आज आपल्यातून जाऊन ३ वर्ष पूर्ण झाले आहे. २४ ऑगस्ट, २०१८ रोजी वयाच्या ६५ व्यावर्षी त्यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. अशातच आज अनेकजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. कलाकारही सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच अभिनेता भरत जाधवने विजय चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करताना एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

भरत जाधवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून विजय चव्हाण यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे की, “बाप ज्याप्रमाणे बोट धरून आपल्या मुलाला शिकवतो त्याला घडवतो, तसा माझ्या आयुष्यातील बाप माणूस म्हणजे विजय चव्हाण. आज मी जो काही डाऊन टू अर्थ आहे, नम्र आहे, वेळेच्या बाबतीत शिस्तबद्ध आहे ते केवळ विजू मामांमुळे. मी स्वतःला नशिबवान समजतो की, करिअरच्या योग्य वळणांवर मला विजू मामांसारखी माणसं भेटली. विजू मामांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. ते एक कलाकार म्हणून – माणूस म्हणून ग्रेट होतेच, पण त्यांच्याविषयी मला विशेष आत्मियता वाटण्याचं कारण म्हणजे लालबाग- परळ , गिरणगावाशी जोडलेली त्यांची नाळ. आम्ही एकत्र खूप काम केलंय. ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकात अनेक ठिकाणी दामोदर पंत त्यांच्या मुलावर (विजू मामांवर) हात उचलतात एवढा मोठा सिनिअर नट पण त्यांनी कधीही आढे वेढे घेतले नाहीत की, हे खूप जास्त होतंय वगैरे. उलट ते म्हणायचे दिग्दर्शकाला जे योग्य वाटतंय ते करा.”

यापुढे भरतने लिहिले की, “मध्यंतरी सुयोग संस्थेतर्फे मोरूची मावशीसाठी मला विचारणा झाली मी विजुमामांना फोन केला की, मी करू का ते म्हणाले ‘तूच कर..! मावशीसाठी मला तालीमही खुद्द विजू मामांनीच दिली. पहिल्या प्रयोगाचा नारळही त्यांच्या हस्तेच फोडण्यात आला, आणि पहिल्या प्रयोगापासूनच मोरूची मावशीलाही हाऊसफुल्ल रिस्पॉन्स मिळू लागला. तो मी विजू मामांचा आशीर्वाद समजतो. ‘मोरूची मावशी’ सोबतच असंख्य चित्रपटांमधून आपल्या विनोदाची छाप मराठी रसिकांवर सोडलेला हा माणूस इतका नम्र कसा. कधी कुणाबद्दलही वेडवाकडं बोलणं नाही, सदैव आजूबाजूला प्रसन्न वातावरण ठेवणं, सर्वांच्या कलेने घेणं हा अनुभव विजू मामांच्या बाबतीत अनेकांना आहे. मराठी सिनेसृष्टीतील पहिली व्हॅनिटी व्हॅन ज्यावेळेस मी घेतली तेंव्हा त्यात पहिल्यांदा मेकअप विजू मामांचा केला. मराठी नटाकडेही आता मेकअप व्हॅन आहे, याचा त्यांना खूप आनंद झाला होता. एकदा एका नाटकाच्या वेळी चालू प्रयोगात मी हसलो होतो, तेव्हा त्यांनी एक मोलाचा सल्ला दिला होता की ‘भरत आपण हसायचं नाही, रसिकांना हसवायचं आहे.’ अण्णा तुमची खूप आठवण येते..! – दामू.” (bharat jadhav share apost on social media while remembaring vijay chavhan)

त्याने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

विजय चव्हाण हे एक प्रतिभावंत कलाकार होते. त्यांचे ‘मोरूची मावशी’ हे नाटक अजरामर झाले आहे. यासोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘पछाडलेला’, ‘झपाटलेला’, ‘जत्रा’, ‘नाना मामा’, ‘सालीने केला घोटाळा’, ‘खबरदार’, ‘खो- खो’, ‘नाथा पुरे आता’, ‘माहेरची साडी’, ‘चष्मे बहादूर’, ‘शुभमंगल सावधान’, ‘चिमणी पाखरं, ‘मुंबईचा डबेवाला’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

हे देखील वाचा