भारती सिंग सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच तिने एक नवीन व्लॉग शेअर केला असून, त्यात ती आपल्या लेकऱाला मिठीत घेऊन रडताना दिसते. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या अश्रूंचं कारणही सांगितलं आहे. भारती म्हणते की, जर तिला मुलगी असती आणि तिने एक दिवस घर सोडून जाण्याची वेळ आली असती, तर ती ते दुःख कधीच सहन करू शकली नसती.
या व्लॉगमध्ये भारती सांगते, “गोल्या मला अचानक सांगितलं की, मम्मी मी तुम्हाला सोडून चाललो आहे… आणि ते ऐकून मला अक्षरशः रडू आलं.” त्यानंतर मुलगा लगेच म्हणतो, “नाही मम्मी, मी जात नाही.” हे ऐकून भारती (bharti)भावुक होत त्याला मिठी मारायला सांगते. पुढे रडत ती म्हणते की, अचानक मुलाने घर सोडण्याची गोष्ट काढल्यामुळे तिला खूप विचित्र वाटलं आणि मनातून खूप वाईट वाटलं.
या प्रसंगावर बोलताना भारती म्हणाली, “मुलं आपल्या आई-वडिलांना कसं काय असं सोडून जाऊ शकतात, हेच कळत नाही. कधी कधी वाटतं, बरं झालं मला मुलगी नाही. कारण तिच्या तोंडून एक दिवस ‘घर सोडते’ हे ऐकून मी अक्षरशः तुटून गेले असते.” पुढे ती म्हणते, “ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना शिकवून, मोठं करून, लग्न करून विदा केलं… त्यांना खरंच सलाम. हे खूप मोठं धैर्याचं काम आहे.” भारतीचा हा व्हिडिओ पाहून अनेक चाहते भावुक झाले असून, अनेकांनी कमेंट्समधून तिच्या भावना समजून घेतल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
टॉक्सिक टीझर; रायाच्या एंट्रीन उडवली खळबळ, ‘डॅडी इज होम’ डायलॉगवर फॅन्स फिदा










