Monday, July 1, 2024

Bharti Singh | ‘हुनरबाज’च्या सेटवर पार पडलं भारती सिंगचं ‘बेबी शॉवर’, व्हिडिओ आला समोर

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) लवकरच पालक बनण्याच्या तयारीत आहेत. तसेच आता नॅशनल टीव्हीवर भारती सिंगचा बेबी शॉवर झाला आहे. होय, रियॅलिटी शो ‘हुनरबाज’च्या सेटवर भारती सिंगच्या बेबी शॉवरचा सोहळा पार पडला. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakravarti), करण जोहर (Karan Johar), परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांनीही भारती सिंगच्या बेबी शॉवरला हजेरी लावली होती.

टीव्हीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा नॅशनल टीव्हीवर एखाद्या कलाकाराचा बेबी शॉवर झाला आहे. खरं तर, कलर्स टीव्हीने ‘हुनरबाज’च्या सेटवर भारती सिंगच्या बेबी शॉवर सोहळ्याच्या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्ष भारतीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून स्टेजवर तिला स्टेजवर आणतो आणि तिला सोफ्यावर बसवतो. दुसरीकडे, करण जोहर, मिथुन आणि परिणिती समोर हळूच भारतीकडे येतात आणि तिच्या डोळ्याची पट्टी काढून सरप्राईज म्हणतात. (bharti singh godh bharai on hunarbaaz desh ki shaan bharti singh baby shower)

यानंतर भारती सिंगच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा आनंद दिसतो. यानंतर करण जोहर म्हणतो की, पहिल्यांदा टीव्हीवर भारतातील गर्भवती अभिनेत्रीचा बेबी शॉवर सुरू होणार आहे. यानंतर भारती सिंगच्या बेबी शॉवरचा सोहळा सुरू होतो. हे सर्व पाहून भारतीला खूप आनंद झाला आणि तिने सर्वांचे आभार मानले. भारती सिंगच्या बेबी शॉवरचा हा एपिसोड शनिवार आणि रविवारी दाखवला जाणार आहे.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा