Tuesday, August 12, 2025
Home टेलिव्हिजन काय सांगता! भारती सिंग पोटात असताना आईला करायचा होता गर्भपात, त्यासाठी करायची ‘या’ गोष्टी

काय सांगता! भारती सिंग पोटात असताना आईला करायचा होता गर्भपात, त्यासाठी करायची ‘या’ गोष्टी

आज भारती सिंगला (Bharti Singh) कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने आपल्या मनोरंजक स्टाईलने चाहत्यांची मने जिंकून, सर्वांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा तिच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. या त्रासात तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वीच गर्भपात करायचा होता.

होय, याचा खुलासा खुद्द भारती सिंगने केला होता. तिने सांगितले की, “माझ्या आईला माझा गर्भपात करायचा होता. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण नंतर तिने तसे केले नाही. मला आठवतंय, एकदा माझी आई माझ्या परफॉर्मेंसच्या आधी आयसीयूमध्ये दाखल झाली होती. यामुळे मला परफॉर्म करावेसे वाटले नाही. पण तिने मला माझे सर्वोत्तम देण्याची प्रेरणा दिली.” (bharti singh mother once wants to abort her before her birth comedian reveals video viral)

भारती सिंगच्या म्हणण्यानुसार, तिच्या आईला आज तिचा अभिमान वाटतो आणि गेलेल्या दिवसांबद्दल बोलताना तिचे डोळे ओले होतात. राजीव खंडेलवालच्या टॉक शो ‘जज्बात’च्या एका एपिसोडमध्ये भारतीने याचा खुलासा केला होता. भारतीने शोच्या सेटवर गोष्टी आनंदाने शेअर केल्या. त्या एपिसोडची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजीव खंडेलवाल भारतीचे म्हणणे ऐकतो आणि म्हणतो, “हे आश्चर्यकारक आहे की, ज्या मुलीला त्यांना जगात आणायचे नव्हते, जग आज त्यांना तिच्याच नावाने ओळखते.”

भारती सिंगचा जन्म ३ जुलै १९८४ रोजी अमृतसर, पंजाबमध्ये झाला होता. त्याच वेळी, ती २ वर्षांची असताना, तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मुलांची सर्व जबाबदारी आईवर पडली. आईने कारखान्यात काम करून मुलांना वाढवले. आज भारती सिंग स्वतः एका मुलाची आई बनली आहे. ती आणि हर्ष लिंबाचिया ३ एप्रिलला आई-वडील झाले.

हे देखील वाचा