Saturday, February 21, 2026
Home टेलिव्हिजन भारती सिंगने चाहत्यांना हात जोडून केली विंनती, मला भेटवस्तू देऊ नका, कारण हि केले स्पष्ट

भारती सिंगने चाहत्यांना हात जोडून केली विंनती, मला भेटवस्तू देऊ नका, कारण हि केले स्पष्ट

भारती सिंग तिच्या कॉमेडी ने सर्वांच्या मनात घर केला आहे. तर ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते ती तिच्या अकाउंट वरती ब्लॉगद्वारे माहिती आणि कॉमेडीने हसत असते, तर नुकतेच तिने नवीन YouTube व्लॉगमध्ये, भारती सिंगने तिच्या चाहत्यांना तिच्यासाठी भेटवस्तू खरेदी करू नका किंवा पाठवू नका अशी मनापासून विनंती केली आहे. भारती सिंगने हात जोडून स्पष्ट केले की त्यांचे प्रेम आणि पाठिंबा तिच्यासाठी कोणत्याही भेटवस्तूपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. भारतीने तिच्या आवाहना मागील कारण देखील स्पष्ट केले.

भारती सिंगने (Bharati shingh)चाहत्यांना केलेल्या विंनती मागील कारण स्पष्ट केले, ती म्हणाली की तिला आणि हर्ष लिंबाचियाला इतक्या महागड्या भेटवस्तू मिळणे ओझ असल्याचे वाटते. तर ती चाहत्यांनी त्यांचे पैसे वाचवावेत किंवा ते एखाद्या उपयुक्त कामासाठी वापरावे अशी तिची इच्छा आहे. तिने विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे वाचवण्यास प्रोत्साहित केले. तिच्या भावनिक संदेशाचे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कौतुक झाले आहे, अनेकांनी तिला जगातील सर्वात गोड व्यक्ती देखील म्हटले आहे, तिचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा लक्षात घेतला आहे. भारती सिंगने तिच्या नवीन YouTube व्लॉगमध्ये व्हॅलेंटाईन डेला तिच्या चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आणि भेटवस्तूंची झलक शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये ती हात जोडून म्हणाली, “हात जोडून, ​​मी माझ्या सर्व फॅन क्लब आणि चाहत्यांना विनंती करते: कृपया मला प्रेम द्या. तुमचे मनोरंजन करणाऱ्या आमच्या गोष्टींना लाईक करा, शेअर करा, पण मला भेटवस्तू देऊ नका, मित्रांनो.”

भारती सिंग पुढे म्हणाली, “तुम्ही अजूनही खूप लहान मुले आहात, तुम्ही अभ्यास करत आहात, म्हणून तुम्ही तुमचे पैसे वाचवून आमच्यासाठी भेटवस्तू खरेदी करता, माझ्यासाठी, हर्ष, गोला किंवा काजू. कृपया असे करू नका, मुलांनो.” ती पुढे म्हणाली, “तुमच्यासाठी काहीतरी करणे हे आमचे कर्तव्य आहे, पण तुम्ही आम्हाला खूप काही द्या. आता, पुढच्या वेळी, जर तुम्ही काही आणले तर आम्ही आमच्या सर्व चाहत्यांसाठी नक्कीच फॅन मीट आयोजित करू.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

हेही वाचा 

बॉलीवूडचे सर्वात मोठा खलनायक, तब्बल 61 व्या वेळा साकारली एकच भूमिका, वारंवार बनले नारद मुनी

हे देखील वाचा