Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन आई झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये कामावर परतलेल्या भारतीला लोकांनी पैशावरून मारले अनेक टोमणे

आई झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये कामावर परतलेल्या भारतीला लोकांनी पैशावरून मारले अनेक टोमणे

आजकाल मनोरंजनविश्वात आपण पाहिले तर लक्षात येईल की, अभिनेत्री आई झाल्यानंतर थोड्याच काळात पुन्हा कामावर परतत त्यांचे काम पूर्ण करताना दिसतात. अभिनेत्रीची कामाप्रती असलेली निष्ठा म्हणा किंवा त्यांची कामबद्दल असलेली कमिटमेंट म्हणा. मात्र या अभिनेत्री डेलिव्हरीनंतर अगदी थोड्याच दिवसात कामावर परताना दिसतात. नुकतीच कॉमेडी क्वीन भारती सिंग आई झाली आणि आई झाल्यानंतर अवघ्या तेरा दिवसातच ती कामावर परतली आहे. याबद्दल तिला अनेकांनी ट्रोल देखील केले.

भारती कामावर परतल्यानंतर तिला मीडियाने विचारले देखील की ती एवढ्या लवकर कामावर कशी काय आली? त्यावर भारती म्हणाली की, “मी माझ्या छोट्या मुलाला सोडून अजिबात कामावर येऊ इच्छित नव्हते. मात्र माझ्या काही वर्क कमिटमेंट असल्यामुळे मला कामावर येते भाग होते. मी कामावर येत होती तेव्हा माझ्या छोट्या मुलाला एकटे सोडून येताना मला खूपच भरून देखील आले. मुलाच्या जन्मानंतर कामावर परतणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते.”

पुढे भारती म्हणाली की, “लोकांनी मला खूप सल्ले दिले अजूनही देत आहे की, एवढ्या लवकर कामावर परतण्याची काय गरज आहे? लोकांनी मला यावर टोमणे देखील मारले की, “एवढ्या छोट्या मुलाला सोडून ही बाई कामावर आली आहे. एवढी किती पैशांची तिला गरज आली आहे. मात्र मी पैशांसाठी नाही तर वर्क कमिटमेंटमुळे कामावर परतली आहे. मला इथे खूप लोकनी पाठिंबा दिला. तर अजूनही अनेक लोकं माझ्या मागे माझ्याबद्दल बोलताना दिसतात.”

भारतीने हे देखील सांगितले की, तिने तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवल्यामुळेच मी पूर्ण नऊ महिने काम करू शकली. भारती म्हणाली, “जेव्हा मी कामावर येते तेव्हा त्याची पूर्ण तयारी करून येते. कारण त्याला कोणताही त्रास नको व्हायला. बाळासाठी घरी संपूर्ण परिवार आहे. लोकांना वाटते की, ही कामावर जाते तर बाळाला कोण आणि कसे दूध पाजते. मला यासर्व गोष्टींचा फरक पडत नाही. घरी त्याच्या दोन आजींसोबत संपूर्ण कुटुंब आहे, यासाठीच मी कोणत्याही दबावाशिवाय कामावर परतली.”

भारतीने २०१७ साली लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. भारती हर्षपेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनलेल्या बायोपिकचे संवाद हर्षने लिहिले आहे. हर्ष आज अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतो. भारत आणि हर्ष ३ एप्रिल रोजी एका मुलाचे आईबाबा झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा