दिगवंत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कठोर भूमिका घेतली आहे. ड्रग्स संदर्भात अनेक सिनेसृष्टीतील स्टार्सच्या घरी छापे टाकले आहेत. शनिवारी एनसीबीटी प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्री भारतीय सिंग हिच्या घरावरही छापा टाकला, तिथे त्यांनी गांजा हस्तगत केला. सध्या भारती सिंगला अटक करण्यात आली असून तिच्या पतीची चौकशी चालू आहे.
भारती सिंग छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. तिने तिच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड दिले आहे. लहान वयातच तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिच्या आईला आणि तिला बराच संघर्ष करावा लागला. भारती सिंगने अमर उजालाशी बोलताना तिच्या संघर्षाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “हा टप्पा गाठण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले आहेत.” पंजाबहून मुंबईला पोहोचण्यासाठी भारती सिंगला खूप वर्ष मेहनत करावी लागली.
भारतीय सिंग म्हणाली, “जेव्हा तिची लाफ्टर चॅलेंज साठी निवड झाली तेव्हा लोक तिच्याबद्दल वाईट बोलत होते. लोक तिच्या आईला म्हणायचे की, तू तिला मुंबईला घेऊन गेलीस, तर तिचं लग्न होणार नाही.” लोकांच्या बोलण्याचा भारतीच्या आईवर कोणताही परिणाम झाला नाही. तिची आई म्हणाली, “मी माझ्या मुलीला एकदा तरी मुंबईला नक्की घेऊन जाईन. कारण तिला असं कधीही वाटलं नाही पाहिजे की, एक संधी मिळाली होती पण माझी आई मला घेऊन नाही गेली.”
भारतीने सांगितले की, “सहा महिने मी मुंबईत राहून लाफ्टर चॅलेंज साठी खूप महिन्यात केली. भारती सिंग जगासाठी एक मोठं नाव केव्हा झाली कळलच नाही. खर सांगायच, तर टीव्हीवर यायच्या आधी मी खूप संघर्ष केला. फी माफ व्हावी यासाठी मी कॉलेजच्या स्पोर्ट्समध्ये सहभागी झाले. मी सकाळी पाच वाजता सराव करायला जायचे, तेव्हा मला रोज जेवणाचे कूपन मिळायचे, पण त्याच कूपन मधून इतर मुली रोज ज्यूस प्यायच्या.”
भारती सिंगने पुढे सांगितले, “मी दररोज मिळणारे ते पाच रुपयाचे कूपन साठवून ठेवायचे आणि महिन्याच्या शेवटी ती कुपन्स वापरून घरी फळ किंवा ज्यूस घेऊन जायचे. त्यावेळी दोन वेळचे जेवणही खूप मुश्किलीने मिळत असे. अशा परिस्थितीत फळ बघून घरातले खुश व्हायचे. त्या काळात मी अमृतसरला थेटर करायचे, तेव्हा कपिल शर्मा लाफ्टर चॅलेंज 3 विजेते झाले होते. एक दिवस त्यांनी मला सांगितले की, ‘या कार्यक्रमाचे नवे पर्व येत आहे, भाग घे.'”
कपिलच्या सांगण्यावरून भारतीने ऑडिशन दिले आणि ती मुंबईसाठी शॉर्टलिस्टही झाली. भारतीने पहिल्यांदा विमानाने प्रवास केला होता. लाफ्टर चॅलेंजनंतर भारती सिंगचे नशीबच बदलले, ती आज यशाच्या शिखरावर आहे.
वाचा-