Friday, July 5, 2024

भाऊ कदम यांनी केला आयुष्यातील सर्वात ‘गोड’ गोष्टीचा खुलासा, भावुक होत केले भरभरून कौतुक

‘चला हवा येऊ द्या’ या शोने महाराष्ट्राला अनेक उत्तम विनोदवीर दिले आहेत. या शोची आन बाण आणि शान म्हणजे अभिनेते भाऊ कदम. भाऊ कदम यांच्यामुळे या शोला एक वेगळी ओळख आणि उंची मिळाली आहे. कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यानंतर भाऊ कदम यांना त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे ओळख मिळाली आणि विनोदाचा बादशाह असे नाव मिळाले. आज भाऊ कदम म्हटले डोळ्यासमोर फक्त विनोद येतो. त्यांनी त्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने स्वतःचे स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे. मात्र प्रभावी अभिनयाची त्याला नक्कीच जोडी आणि कुटुंबाचा पाठिंबा.

सोशल मीडियावर सध्या भाऊ कदम यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात गोड गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. झाले असे की, भाऊ कदम यांच्या मुलीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भाऊंनी त्यांच्या मुलीचे मृण्मयीचे भरभरून कौटू करत तिला सर्वात गोड म्हटले आहे.

मृण्मयीने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “सगळ्यात जास्त चांगली भावना ती असते जेव्हा तुमच्या वडिलांच्या तोंडून तुम्ही तुमचं कौतुक ऐकता. ते म्हणतात की त्यांना तुमचा अभिमान आहे.” हा व्हिडिओ भाऊ यांच्या या मुलाखतीची एक छोटी क्लिप आहे, ज्यात ती मुलीचे कौतुक करत आहे.

या व्हिडिओमध्ये मुलाखतकार भाऊंना सगळ्यात गोड गोष्टींबद्दल विचारतो. यावर उत्तर देताना ते त्यांच्या मुलीचे नाव घेतात आणि म्हणतात “मृण्मयी फार गोड आहे. तिचा कधीही त्रास नाही. कोणालाच नाही त्रास दिला तिने. ती तिच्या जगात छान असते. ती आतापर्यंत सर्व बघत आली. जेव्हा माझ्याकडे काही नव्हते तेव्हाचा माझा संघर्ष तिने पाहिलाय, आणि आता जेव्हा यश मिळते ते ही ती बघतेय. त्यामुळे तिला माहित आहे की, कसे काय वागायचे, बाकीचीही भावंडं असल्यामुळे देखील तिला जाणीव आहे की, या परिस्थितीत कसे राहायाचे. त्यामुळे ती गोडच आहे. तिने आम्हाला समजून घेतले. तिने तिच्या आईवडिलांना समजून घेतले. की नाही जे आहे ते आहे. खूप समजूतदार आहे ती.”

दरम्यान हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत असून, यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत मृण्मयीचे कौतुक केले आहे. मृण्मयीने अतिशय कमी वयात सावंतच्या व्यवसाय सुरु केला आहे. २०२० साली महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने ‘तारुंध्या’ नावाचा एक ब्रँड सुरु केला आहे. यामध्ये ती अतिशय ट्रेंडी आणि सुंदर असे हेयर बो बनवते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट
राखी सावंत पुन्हा संकटात, ड्रामा क्वीनला पुन्हा माराव्या लागणार कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा

हे देखील वाचा