Monday, July 1, 2024

धक्कादायक! भोजपुरी अभिनेत्याकडे सापडल्या ५० लाख रुपयांच्या बनावट नोटा, सापळा रचून केली पोलिसांनी अटक

कोरोना व्हायरसमुळे चित्रपटसृष्टीचे खूप नुकसान झाले होते. या व्हायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान सामान्य व्यक्तींपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच फटका बसला होता. अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाचीही पंचायत झाली होती. परंतु यादरम्यान काही व्यक्तींनी वाईट कामे करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये भोजपुरी अभिनेत्याचाही समावेश आहे. लॉकडाऊनदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अभिनेत्याने निर्मात्यासह मिळून गाड्या चोरायला सुरुवात केली होती. याचसोबत त्याने बनावट नोटा छापण्याचेही काम सुरू केले होते. परंतु आता या अभिनेत्यासह आणखी एका आरोपीला दक्षिण पूर्व दिल्लीच्या AATS (एँटी-ऑटो थेफ्ट स्क्वॉड) ने अटक केली आहे.

वृत्तानुसार, या अभिनेत्याचे नाव मोहम्मद शाहिद असे आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव सैय्यद जैन हुसैन असे आहे. या दोन आरोपींकडे तब्बल ५० लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि चोरी केलल्या दोन गाड्याही (दुचाकी) मिळाल्या आहेत.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी रचला होता सापळा
चौकशीदरम्यान समजले की, अभिनेत्याने ‘इलाहाबाद टू इस्लामाबाद’ भोजपुरी चित्रपटामध्ये काम केले आहे. सोबतच त्याचे ‘साहिल सनी फिल्म प्रॉडक्शन हाऊस’देखील आहे. याव्यतिरिक्त तो अनेेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, पोलिसांना दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्ह्यात अनेक गाड्या चोरीला गेल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि नजर ठेवायला सुरुवात केली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे, १२ मार्च रोजी न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.

यादरम्यान AATS ला रात्री ८.२५ वाजता एका काळ्या रंगाची स्कूटी येताना दिसली. पोलिसांनी जेव्हा स्कूटी थांबवून वाहनचालकाला कागदपत्र मागितले, तेव्हा तो कारणं सांगू लागला. यानंतर त्या गाडीबाबत माहिती गोळा करण्यात आली, तेव्हा समजले की, ती गाडी जामिया नगर येथून चोरण्यात आली होती. आरोपी शाहिदला अटक करून चौकशी केली असता, समजले की त्याच्याकडे ५० लाख रुपयांच्या बनावट नोटाही आहेत. त्याने सांगितले की, हरीनगर आश्रममध्ये एक चित्रपट स्टुडिओ चालवत होता, ज्याचे नाव साहिल सैनी फिल्म प्रॉडक्शन हाऊस असे होते.

असा करायचा हेराफेरी
भोजपुरी अभिनेत्याने सुरुवातीला नेहरू प्लेस, लाजपत नगर आणि न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील लोकांना आपला निशाना बनवले होते. हे आरोपी गर्दी असलेल्या बाजारात बनावट नोटा चालवण्यासाठी लोकांना तीन बनावट नोटा देत असायचे आणि त्याबदल्यात एक बनावट नोट घ्यायचे. नोटांचा वापर झाल्यानंतर ते आरोपींना दुसऱ्या नोटा देत असायचे. त्यानंतर अभिनेता एका गाडी चोरणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आला आणि त्याने गाड्यांची चोरी करण्यास सुरुवात केली होती. परंतु आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

-लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा

-दुःखद!! अभिनेता हेनरी डॅरो यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन

हे देखील वाचा