Wednesday, October 15, 2025
Home भोजपूरी मोठ्या बॉलिवूडस्टारला देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकेल खेसारी लाल यादव ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती

मोठ्या बॉलिवूडस्टारला देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकेल खेसारी लाल यादव ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती

बॉलिवूड आणि टॉलिवूडला तोडीस तोड आज भोजपुरी इंडस्ट्री आहे. इथे काम करणाऱ्या कलाकरांना देखील अमाप लोकप्रियता मिळते. याच भोजपुरीमध्ये काम करणार सुपरस्टार अभिनेता म्हणजे खेसारी लाल यादव. खेसारीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोठ्या संघर्षाने त्याने त्याचे करियर तयार केले. त्याने त्याच्या चित्रपटांमधून आणि गाण्यांमधून लोकप्रियतेसोबतच भरपूर संपत्ती देखील जमा केली. खेसारीने बिग बॉसच्या १३ व्या पर्वात देखील सहभाग घेतला होता. त्यानंतर त्याला संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळाली. भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा स्टार असणाऱ्या खेसारीने आपल्या प्रतिभेच्या जोरावर लोकांच्या मनात जागा निर्माण केली.

आज कोट्यवधी कमावणारा खेसारी लाल कधीकाळी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हात गाडीवर लिट्टी चोखा विकायचा. आज भोजपुरी इंडस्ट्रीमधील एक ब्रँड म्हणून खेसारीकडे पाहिले जाते. त्याचा प्रत्येक सिनेमा आणि गाणी केवळ त्याच्या नावामुळे हिट होतात. खेसारी लाल आज अतिशय लक्झरी आणि सुखात त्याचे आयुष्य जगत आहे. प्राप्त माहितीनुसार खेसारी लाल यादवची नेटवर्थ आहे तब्ब्ल २/३ मिलियन डॉलरच्या आसपास आहे.

Photo Courtesy: Instagram/khesari_yadav

खेसारी लाल यादव एका सिनेमासाठी तब्ब्ल ५० ते ६० लाख रुपये चार्ज करतो. याशिवाय जाहिरातींसाठी देखील तो भरभक्कम रक्कम घेतो. खेसारी लालचे पाटणामध्ये एक मोठे घर असून त्याची किंमत जवळपास ५ कोटींच्या आसपास आहे. मुंबईमध्ये देखील त्याने एक आलिशान फ्लॅट घेतला आहे. यासोबतच खेसरी लालकडे गाड्यांचे देखील कलेक्शन आहे. त्याच्याकडे Toyota Fortuner, बीएमडब्ल्यू, फॉर्च्यूनर आदी गाड्या असून, बाईक देखील आहे. खेसारी लालची एकूण संपत्ती १४ कोटींच्या आसपास आहे.

खेसारी लाल यादवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर २०२३ मध्ये त्याचे अनेक सिनेमे येणार असून, सध्या तो त्याच्या चित्रपटांवर काम करत आहे. माहितीनुसार त्याच्याकडे आता ५ सिनेमे असून ‘वास्तव’, ‘संघर्ष’, ‘सन ऑफ बिहार हैं’ हे त्याची गाजलेले सिनेमे आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा