Tuesday, July 9, 2024

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगचे वैयक्तिक आयुष्य राहिले चर्चेत, तीन अफेयर दोन लग्न होऊनही आज तो एकटा

भोजपुरी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता असलेल्या पवनसिंगचा आज वाढदिवस. आज पवन सिंगला कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. भोजपुरी इंडस्ट्रीमधील टॉपचा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. त्याचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी बिहार मधल्या आरा या गावात झाला. ग्लॅमर जगात आल्यानंतर पवनसिंगचे ‘ओढ़निया वाली’, ‘लॉलीपॉप लागेलु’ हे अल्बम अमाप गाजले. याशिवाय त्याने केलेल्या भोजपुरी चित्रपटांना देखील अमाप लोकप्रियता मिळाली. पवन सिंगला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात कोणीही टक्कर देऊ शकत नाही. मात्र त्याचे वैयक्तिक आयुष्य खूपच वादात राहिले. त्याचे दोन लग्न झाले असून अनेक भोजपुरी अभिनेत्रींसोबत त्याच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या. मात्र त्या सर्व अभिनेत्रींनी त्याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील लावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Singh ???? (@pawansingh__999)

मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याचे भोजपुरीमधील राणी चटर्जी, अक्षरा सिंग आणि मोनालिसा या तीन अभिनेत्रींसोबत अफेयर होते. सुरुवातीच्या काळात राणी चटर्जी, मोनालिसा आणि पवन सिंग यांनी ‘देवरा बड़ा सतावेला’ या भोजपुरी सिनेमात एकत्र काम केले होते. हा सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर त्याचे नाव मोनालिसासोबत जोडले गेले. त्यानंतर राणीने एका मुलाखतीमध्ये नाव न घेता सांगितले होते की, तिचे एका भोजपुरी अभिनेत्यासोबत अफेयर होते, मात्र त्याने तिचे शोषण केले, तिला मारहाण केली. त्यानंतर राणीचे नाव पवन सिंगसोबत जोडले गेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Singh ???? (@pawansingh__999)

त्यानंतर पवन सिंगचे नाव अक्षरा सिंगसोबत देखील जोडले गेले होते. जेव्हा पवनच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली त्यानंतर त्याचे नाव अक्षरासोबत जोडले गेले. या दोघांचे अफेयर आणि ब्रेकअप मीडियामध्ये तुफान गाजले. एका रिपोर्टनुसार दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र पुढे अक्षराने पवनवर अनेक गंभीर आरोप लावले होते. तिने सांगितले की पवनने ज्योती सिंगसोबत केलेले लग्न तिच्यापासून लपवून ठेवले. जेव्हा अक्षराला हे समजले तेव्हा तिने ब्रेकअपचे सांगितले याचा पवनने विरोध केला आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Singh ???? (@pawansingh__999)

तत्पूर्वी पवनने पाहिले लग्न नीलम सिंगसोबत केले होते. मात्र २०१५ साली तिने आत्महत्या केली. पुढे २०१८ ला त्याने अभिनेत्री ज्योती सिंगसोबत लग्न केले मात्र त्यांचे लग्न देखील यशस्वी झाले नाही. लवकरच ते घटस्फोट घेणार असून सध्या त्यांची कोर्टात केस सुरु आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी
‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा

 

हे देखील वाचा