भोजपुरी अभिनेता राकेश मिश्रा त्याच्या अभिनयाबरोबरच गायनासाठीही खूप चर्चेत असतो. त्याचा आवाज प्रेक्षकांना खूप आवडतो. म्हणूनच त्याचे कोणतेही गाणे आले, तर त्याला काही तासांमध्येच लाखो व्ह्यूज मिळतात. अशातच आता त्याचे ‘वायरल भईलू फेसबुक प’चे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री त्रिशाकर मधू देखील दिसत आहे. एमएमएस व्हायरल झाल्यानंतर हे तिचे पहिलेच व्हिडिओ गाणे आहे, जे एक ‘सॅड सॉंग’ आहे.
राकेश मिश्रा आणि त्रिशाकर मधू यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या भोजपुरी ‘वायरल भईलू फेसबुक प’ या गाण्याचा व्हिडिओ, पीआरए फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडिओला १३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर बरेच लाइक्सही मिळाले आहेत. (bhojpuri actor rakesh mishra new bhojpuri song viral bhailu facebook pa with trishakar madhu first video song after mms viral raya)
हे गाणे राकेश मिश्रा आणि सुरभी शिवानी यांनी गायले आहे आणि हे गाणे अरुण बिहारी यांनी लिहिले आहे. त्याचबरोबर छोटू रावत यांनी संगीत दिले आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन आर्यन देव यांनी केले आहे.
त्रिशाकर मधूचा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर राकेश मिश्रासोबतचा तिचा हा पहिलाच व्हिडिओ आहे, जो प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी ती तिच्या एका अश्लील व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. हा व्हिडिओ युजर्सने सोशल मीडियावर खूप व्हायरल केला होता. शिवाय त्यांनी तिच्या या व्हिडिओला प्रचंड ट्रोल केले. मात्र, आता ते प्रकरण मिटले आहे.
दरम्यान, जेव्हा तिचा ‘वायरल भईलू फेसबुक प’ हे गाणे रिलीझ झाले, तेव्हा प्रेक्षकांना तिच्या व्हायरल एमएमएसची आठवण झाली आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला पुन्हा एकदा ट्रोल केले. एका युजरने लिहिले की, “मधुचा व्हायरल शब्दाशी इतका संबंध आहे की, कोणालाही विचारण्याची गरज नाही.” यासोबतच दुसऱ्या युजरने लिहिले, “त्रिशाकर मधु खूप चांगले व्हिडिओ बनवते.” त्यांचा हा व्हिडिओ आता यूट्यूबवर व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज
-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता










