सुपरस्टार रवी किशन यांनी भाेजपुरी चित्रपटांव्यतिरक्त हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, अलीकडेच त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी किशन यांचे मोठे भाऊ राम किशन शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचे वय 53 वर्षे होते. अभिनेत्याच्या भावाचे दुपारी 12 च्या सुमारास निधन झाले. याबाबतची माहिती खुद्द अभिनेत्याने इंस्टग्रामवर पाेस्ट शेअर करून दिली आहे.
आपल्या भावाच्या मृत्यूची माहिती देताना रवी किशन (ravi kishan) यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘दुःखाची गोष्ट म्हणजे माझे मोठे भाऊ श्री रामकिशन शुक्लाजी यांचे आज दुपारी 12 वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ओम शांती शांती शांती महादेवाला त्यांच्या पावन चरणी स्थान द्यावे ही विनंती. रवी किशनच्या या पोस्टवर कमेंट करत भोजपुरी स्टार्स दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ, आम्रपाली दुबे, अक्षरा सिंग आदींनीही दुःख व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
रामकिशन यांच्या पत्निचे आधीच झाले हाेते निधन
खासदाराचा मोठा भाऊ मुंबईत राहून रवी किशनच्या निर्मितीचे काम पाहत असे. मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी (दि. 05 फेब्रुवारील) दुपारी काम करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर राम किशन शुक्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रविकिशनचा हा भाऊ तीन भावांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते, तर रामकिशन यांच्या पत्नीचे आधीच निधन झाले हाेते.(bhojpuri actor ravi kishan brother ram kishan shukla death due to heart attack)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
देश आणि क्रिकेट प्रेमासाठी लता दीदींनी 1983 विश्वकप जिंकलेल्या टीमसाठी केला होता फ्री कॉन्सर्ट, आणि…
शेवटच्या क्षणी लतादीदी होत्या वडिलांच्या आठवणीत, वेंटीलेटर असतानाही मागवली गाण्याची रेकॉर्डिंग