Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आकांक्षा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल म्हणाली, ‘मला काही झाल्यास त्याला जबाबदार…’

भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबेच्या मृत्यूनंतर तिचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती काही आरोप करताना दिसत असून, रडत देखील आहे. तिला काही झाले तर कोणाला जबाबदार धरावे हे देखील तिने या व्हिडिओमधून स्पष्ट केले आहे. आकांक्षांच्या मृत्यूनंतर २४ दिवसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आकांक्षा म्हणते की, “मला नाही माहीत की माझ्याकडून नक्की काय चूक झाली आहे, पण आता मला या जगात राहायचे नाही. हा व्हिडिओ माझा तुमच्यासोबतचा शेवटचा विषय असणार आहे. मला काही झाले तर त्याला समर सिंगच जबाबदार असेल.” आता या व्हिडिओमुळे आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात समर सिंगवरील संशय अधिकच वाढला आहे.\

व्हिडिओची अजून पुष्टी झालेली नाही, मात्र आकांशाने तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी या व्हिडिओला स्टोरीमध्ये पोस्ट केले होते. आकांक्षा मृत्यू केसमध्ये पोलिसांनी अधिक समर सिंगल अटक केली असून त्यांची सध्या चौकशी सुरु आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आकांक्षाची आई मधू दुबे यांनी समर सिंगच्या अटकेवर आनंद व्यक्त करत त्याला साथ देणाऱ्या लोकांवर संताप व्यक्त केला आहे. समर सिंगल फाशी दिली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली. मधु दुबे यांनी सांगितले की, समर सिंगने हॉटेल मॅनेजरच्या आणि इतर लोकांच्या मदतीने आकांशाची हत्या केली आहे. आकांक्षा दुबे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे अशी मागणी देखील त्यांनी केली.

तत्पूर्वी २६ मार्च रोजी आकांशा वाराणसीमध्ये एका हॉटेलच्या रूममध्ये फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबाने समर सिंगच्या भावावर आणि समर सिंगवर अनेक आरोप देखील केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसवर आणि निर्मात्यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी

हे देखील वाचा