Wednesday, July 3, 2024

‘सब की बारात आये’ गाणे म्हणत अभिनेत्री आम्रपाली दुबेची स्वारी निघाली नववधूच्या अवतारात

भोजपुरी चित्रपटांची सुपरहिट अभिनेत्री आम्रपाली दुबे हिची गणना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. आम्रपालीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट भोजपुरी चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर तिने जवळपास प्रत्येक सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. अभिनयासोबतच आम्रपाली सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. आम्रपालीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. भोजपुरी क्वीन ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एक आहे. आम्रपालीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो खूप व्हायरल होत आहे.

खरंतर, आम्रपालीने (Amrapali Dubey) काही वेळापूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आम्रपाली वधूच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये, आम्रपाली उर्मिला मार्तोंडकरच्या ‘सबकी बारातें आई डोली तू भी लाना’ या आयकॉनिक गाण्यावर वधूचा लूक परिधान केलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये आम्रपाली गाडीतून कुठेतरी जाताना दिसत आहे. असे वाटत आहे की, आम्रपालीने तिच्या एका शूटसाठी हा ब्रायडल लूक केला आहे.

आम्रपालीचा हा व्हिडिओ काही तासांतच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ब्राइडल लूकसह आम्रपालीच्या या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडिओला अल्पावधीतच हजारो लाईक्स मिळाले आहेत. तिच्या या व्हिडिओ ला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले  आहेत. आम्रपाली सतत तिचे नवनवीन रील सोशल मीडियावर शेअर करत असते.

आम्रपाली दुबे भोजपुरी सिनेमापूर्वी नॅशनल टीव्हीवर देखील दिसली आहे. आम्रपालीने ‘सात फेरे’, ‘मेरा नाम करगी रोशन’, ‘रहना है तेरी पलक की छांओं में’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. आम्रपाली दुबेने भोजपुरी इंडस्ट्रीत पहिले पाऊल निरहुआच्या ‘निरहुआ हिंदुस्तानी’ या चित्रपटातून ठेवले.

हेही वाचा :

हे देखील वाचा