Wednesday, October 15, 2025
Home भोजपूरी भोजपुरी अभिनेत्री असलेल्या मोनालिसाने करीना कपूरला कॉपी करत दाखवला सिझलिंग अवतार

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या मोनालिसाने करीना कपूरला कॉपी करत दाखवला सिझलिंग अवतार

अभिनेत्री मोनालिसा भलेही बऱ्याच काळापासून भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. सतत ती काही ना काही पोस्ट शेअर करत तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहते. एवढेच नाही तर भोजपुरी कलाकारांमध्ये सर्वाधिक फॉलोवर्स असणारी अभिनेत्री म्हणून मोनालिसा ओळखली जाते. तिला इंस्टाग्रामवर तब्बल ५ मिलियन फॉलोवर्स असून, तिची प्रत्येक पोस्ट तुफान व्हायरल होत असते. नुकताच मोनालिसाने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती करीना कपूरला कॉपी करताना दिसत आहे.

मोनालिसाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती कभी ख़ुशी कभी गम सिनेमातील करीना कपूरने साकारलेल्या पूजाला कॉपी करताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला या साणमातील करीना कपूरच्या तुफान गाजलेले संवाद ”कौन है जिसने पू को मुड़कर नहीं देखा’ बोलताना दिसत आहे. तिच्या अदा आणि अंदाज देखील एकदम करीना कपूरला टक्कर देईल असाच आहे. या व्हिडिओमध्ये मोनालिसा पारंपरिकसोबतच बोल्ड अवतारात दिसत आहे. जिथे तिने पिवळ्या रंगाचा सुंदर सूट घातला आहे तर दुसरीकडे तिचा काळ्या रंगातील वेस्टर्न ड्रेसमधील लूक भाव खाऊन जात आहे. तिच्या या व्हिडिओवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत हार्ट, फायर अशा अनेक ईमोजी पोस्ट करताना दिसत आहे.

मोनालिसा ही फक्त भोजपुरी अभिनेत्री म्हणून नाही तर टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने टीव्हीवर नजर, नमक इस्क का, कानपुर वाले खुरानास आदी मालिकांमध्ये काम केले आहे. यातली तिची नजर मालिकेतील भूमिका तुफान गाजली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा