Monday, July 1, 2024

मोनालिसाने नेहा कक्करच्या गाण्यावर चक्क विमानामध्ये लावले ठुमके; चाहते झाले पुरते घायाळ

बिग बॉसच्या घरामध्ये गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनयातील भविष्य उज्वल झाले आहे. अशात भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा देखील ‘बिग बॉस’च्या १० व्या पर्वामध्ये सहभागी झाली होती. तिने या शोनंतर टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये भरारी घेतली. अभिनेत्री सुरुवातीला भोजपुरी गाण्यांमध्ये डान्स आणि अभिनय करताना दिसायची. परंतु आता ती मालिकांमध्ये देखील दमदार अभिनय करत आहे.

मोनालिसा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना खुश करते. अशात तिने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नेहा कक्करच्या ‘कांटा लगा’ या गाण्यावर डान्स करत आहे. यामध्ये तिने चकचकीत लाल रंगाचा एक ड्रेस घातला आहे. हा ड्रेस स्लिवलेस असून यावर तिने लाल रंगाची गडद टिकली भाळी लावली आहे. तसेच मोकळ्या केसांमध्ये आणि या पंजाबी ड्रेसमध्ये तिचे रूप अधिकच खुलून आले आहे. (Bhojpuri actress Monalisa dance on kanta Laga song inside flight see viral video)

या गाण्यावर ती एका विमानामध्ये डान्स करताना दिसत आहे. तसेच तिने ‘कांटा लगा’ या गाण्यावर केलेल्या डान्सने आणि तिच्या ठुमक्यांनी चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील चाहत्यांना भुरळ घालत आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये तिच्या या डान्सचीच चर्चा सुरु आहे. तिच्या या व्हिडिओला काही तासांमध्येच हजारोंच्या घरात लाईक्स आले आहेत. काहींनी तिला फार गोड आणि मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “खूप सुंदर डान्स केला आहे.” तसेच दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “बकवास गाण्यावर सुंदर डान्स.”

मोनालिसाने बिग बॉस नंतर ‘नजर’ आणि ‘नमक इस्क का’ या मालिकांमध्ये अभिनय केला. तिच्या या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. विशेष म्हणजे ‘नजर’ या मालिकेमध्ये डायन बनलेल्या मोनालिसावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा