Thursday, July 24, 2025
Home भोजपूरी बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस

बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस

भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री मोनालिसाचे नाव सगळ्यात टॉपला असते. मोनालिसा भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री आहे. ती तिचे अनेक वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या सौंदर्याचे दर्शन प्रेक्षकांना देत असते. अनेक भोजपुरी चित्रपटात काम केल्यानंतर मोनालिसा आता टेलिव्हिजनवर काम करू लागली आहे. तिने टेलिव्हिजन दुनियेत देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे सगळे दीवाने आहेत, पण त्यासोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टची सर्वत्र चालू असते. मोनालिसा सध्या तिचा पती विक्रांतसोबत मालदीवला गेली आहे. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मोनालिसाच्या तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या पतीसोबतचे मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते दोघेही स्विमिंग पूलमध्ये नाश्ता करत आहेत. मोनालिसाने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच तिने दोन वेण्या घातल्या आहेत आणि केसात जास्वंदीचे फुल लावले आहे. यासोबत तिचा पती विक्रांत शर्टलेस दिसत आहे. तसेच त्याने डोळ्यांवर चष्मा लावला आहे. या फोटोमध्ये त्या दोघांची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. (bhojpuri actress monalisa enjoying in maldives share photo with her husband)

त्यांच्या या फोटोवर त्यांचे अनेक चाहते कमेंट्स करत आहेत. त्यांची जोडी आधीपासूनच लोकप्रिय आहे. त्यांची प्रेम कहाणी सर्वांनीच पाहिली आहे.

मोनालिसा ही ‘बिग बॉस १० ची’ स्पर्धक होती. त्यावेळी तिने तिच्या बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत याच्याशी २०१७ मध्ये बिग बॉसमध्येच लग्न केले होते. त्यावेळी देखील ती खूपच चर्चेत होती. तिने ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने ‘नजर’ आणि ‘नजर 2’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. यासोबत तिने ‘सुहाग’, ‘तौबा तौबा’, ‘प्रतिज्ञा’, ‘गदर’, ‘अदालत’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

हे देखील वाचा