Saturday, June 21, 2025
Home भोजपूरी भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मोनालिसाचे बिना मेकअप फोटो, साडीवर दिसतेय सौंदर्याची खाण

भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मोनालिसाचे बिना मेकअप फोटो, साडीवर दिसतेय सौंदर्याची खाण

भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री मोनालीचे नाव सगळ्यात टॉपला असते. मोनालिसा भोजपुरी चित्रपट सृष्टीमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री आहे. ती तिचे अनेक वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या सौंदर्याचे दर्शन प्रेक्षकांना देत असते. अनेक भोजपुरी चित्रपटात काम केल्यानंतर मोनालिसा आता टेलिव्हिजनवर काम करू लागली आहे. तिने टेलिव्हिजन दुनियेत देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे सगळे दिवाने आहेत. पण त्यासोबत ती चर्चेत असते, तिच्या सोशल मीडिया पोस्ट वरून. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मोनालिसाने नुकताच तिचा काळा स्लिव्हलेस ब्लाऊज आणि फ्लोरोसेंट साडीमधील एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहे. या पोशाखात तिने वेगवेगळ्या पोझ देत फोटो काढले आहे. तिने या फोटोमध्ये कोणताच मेकअप केलेला दिसत नाहीये. तरीही ती या फोटोमध्ये खूपच सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे.

तिचा हा बीनामेक मेकअप फोटो देखील तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळे तिला प्रतिक्रिया देऊन तिच्या या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक करत आहेत. मोनालिसा ही भोजपुरी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावू शकतो की, तिचे इंस्टाग्रामवर ४.३ मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत.

मोनालिसाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ती सुखरुपपणे बाहेर पडली आहे. याआधी ती तिचे वजन कमी झाल्याकारणाने देखील चर्चत आली होती. तेव्हा सगळेजण तिला तिचे वजन कमी झाल्यामागचे कारण विचारत होते. मोनालिसा ही बिग बॉस १० ची स्पर्धक होती. तेव्हा तिने तिच्या बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत याच्याशी २०१७ मध्ये बिग बॉसमध्येच लग्न केले होते. त्यावेळी देखील ती खूपच चर्चेत होती.

हे देखील वाचा