चित्रपसृष्टीतील अनेक कलाकार आपली शरीरयष्टी उत्तम बनवण्यासाठी मोठी कसरत करत असतात. यामध्ये अभिनेते जिममध्ये जातातच, परंतु अनेक अभिनेत्री देखील स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जात असतात. स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिमबरोबरच आहारात देखील बदल करतात. या यादीत अनेक अभिनेत्रींचा समावेश होतो. बॉलिवूड अभिनेत्रींना तोडीसतोड टक्कर देत भोजपुरी अभिनेत्री देखील आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत. अशातच भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक जिममधील व्हिडिओ पोस्ट केला आहे.
राणीचा हा व्हिडियो जिममधला आहे व ती इथे वर्कआऊट करताना दिसत आहे. तसेच जिममध्ये रणवीर सिंगचे “अपना टाइम आएगा” हे गाणं वाजत आहे. मागे ऐकू येत असलेल्या गाण्यामुळे नेटकरींनी विविध तर्कवितर्क लावत आहे. काहीजण म्हणत आहेत की, तिला बॉलिवूडमधून मोठी ऑफर आली आहे. तर काहीजण म्हणतायेत की, लवरकच ती काहीतरी मोठं करणार आहे, राणीने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलंय की, “खुप दिवसानंतर जिममध्ये जाणं म्हणजे पुन्हा नव्याने सगळं सुरू करावं लागणार.” (bhojpuri actress rani chaterjee instagram video viral saying apna time aayega watch full video here)
राणीने २००३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून भोजपुरी चित्रपटांमधून तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्रीने भोजपुरीसह पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे. साल २०२० मध्ये तिला दोन वेबसिरीजमध्ये काम मिळाले होते. एम एक्स प्लेअर वरील ‘मस्तराम’ व कूकु ॲपवरील ‘राणी का राजा’ या वेबसिरीज मध्ये तिने काम केले आहे. तिच्या चित्रपटांप्रमाणेच वेबसिरीजला देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.
राणी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या फिटनेसमुळे देखील सध्या चांगलीच गाजत आहे. राणी गेल्या दिवसांत काळात खूप आजारी होती. परंतु तरी देखील तिच्या फिटनेसवर याचा किंचितही परिणाम झाला नाही. तिचा जिम मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या एका चाहत्याने तिला कमेंट करत विचारले की, “अजून किती फिटनेस पाहिजे, तुला अजून किती बारीक व्हायचं आहे.” विशेष म्हणजे राणी आजारी होती, तरी देखील तिच्या फिटनेसमध्ये बदल झाला नसल्याने तिच्या चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम पेजवर सॅड पोस्ट शेअर करत आहे. एका व्हिडिओमध्ये ती अलका याज्ञिकचे ‘मुझसे हुई बस ये खता’ या गाण्यावर लिप्सिंग करत होती व ‘दिलं तुटने की आवाज नही होती” असे कॅप्शनही लिहिले होते. तसेच तिचा “तू भूल गया सारी वे गल्लां मैं ना भूली” या पंजाबी गाण्यावरचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-