भोजपुरी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे राणी चटर्जी. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे ट्रॅडिशनल तसेच मॉडर्न फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
राणी तिच्या चित्रपटासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत चर्चित असते. नुकतेच तिचे पारंपरिक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
राणीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या आणि लाल रंगाचा घागरा घातला आहे. तसेच गळ्यात एक हार घातला आहे. तिने हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहे. या तसेच मेकअप देखील केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. तिचे अनेक चाहते तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या ड्रेसचे देखील कौतुक करताना दिसत आहे. तिचा हा पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
नुकतेच काही दिवसापूर्वी राणी चटर्जी ही तिचा बॉयफ्रेंड मंदीप बामरा याच्यासोबतच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चित होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटो शेअर केले होते. यावरून सगळे असा अंदाज लावू शकतात की, त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे.
राणीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या तिची आगामी वेब सीरिज ‘वो पहला प्यार’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने शेअर केलेला हा फोटो त्याच्या या वेब सीरिज मधील आहे, अशी सर्वत्र चर्चा चालु आहे.
https://www.instagram.com/p/CNRaMVmAL1I/?utm_source=ig_web_copy_link
यामध्ये ती अभिनेता हितेन तेजवानी याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी तिने ‘लेडी सिंघम’, ‘छोटकी ठकुराईन, ‘कसम दुर्गा की’, ‘तेरी मेहरबानीया’, ‘हेराफेरी’ या चित्रपटात काम केले आहे.










