Saturday, June 29, 2024

‘अल्लाह’साठी आणखी एका अभिनेत्रीने सोडले कलाविश्व, पोस्ट होतेय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसिम(zaira wasim)आणि सना खाननंतर भोजपुरी अभिनेत्री सहर अफशा(Shahar Afsha)हिने आता इस्लाम धर्मासाठी सिनेसृष्टीचा चकचकीत रस्ता सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी फिल्मी जगताला रामराम ठोकणाऱ्यांच्या यादीत आता एका अभिनेत्रीच्या नाव जोडले गेले आहे. खेसारी लाल यादव, पवन सिंह यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीने इस्लाम धर्मासाठी सिनेसृष्टीला अलविदा केला आहे.

गेल्या काही वर्षात मात्र विशिष्ट एका धर्मासाठी चित्रपटसृष्टी सोडणाऱ्या अभिनेत्रींची चांगलीच चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसिम, तसेच अभिनेत्री सना खान यांनी इस्लामसाठी सिनेसृष्टीमध्ये काम करायचे सोडल्यामुळे तिची चांगलीच चर्चा झाली होती. आता एका भोजपुरी अभिनेत्रीने हा निर्णय घेतला आहे. भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या सफर अफशा या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतून बाहेर पडत असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली आहे.

 

View this post on Instagram

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भोजपुरी अभिनेत्री सहर अफशा एक पोस्ट लिहित म्हणाली,”मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की मी आजपासून मनोरंजन विश्वाला अलविदा घेत आहे. यापुढे इस्लाम आणि अल्लाहची सेवा हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल. मी माझ्या परमेश्वराकडे केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागते, माझ्या नवीन प्रवासासाठी तुमच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत.” ही पोस्ट तिने हिंग्लिश, इंग्रजी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये पोस्ट शेअर केला आहे.

यावर सना खानने प्रतिक्रिया दिली
सहरच्या या पोस्टवर सना खानने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की ‘माशाअल्लाह माझी बहिण मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. अल्लाह तुम्हाला प्रत्येक पावलावर यश देवो. तुम्ही अधिकाधिक लोकांना प्रेरणा देता आणि मानवतेचे साधन बनत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सना खानने दोन वर्षांपूर्वी अभिनय सोडून इस्लामचा मार्ग स्वीकारला आणि 2020 मध्ये तिने अनस सय्यदसोबत लग्न केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हुमा कुरेशी बनली लठ्ठ महिला! आगामी चित्रपटांचा घेऊ शकता ‘या’ दिवशी आनंद

अल्पवयीन मुलाच्या खांद्यावर सोपवली सलमानला उडवण्याची जबाबदारी, पोलिसांचा खळबळजनक खुलासा

हे देखील वाचा