Tuesday, March 3, 2026
Home भोजपूरी पवनसिंगसोबत काम करून चमकले नशीब, वडिलांच्या विरोधात जाऊन पूर्ण केले शुभीने अभिनेत्री होण्याचे स्वप्न

पवनसिंगसोबत काम करून चमकले नशीब, वडिलांच्या विरोधात जाऊन पूर्ण केले शुभीने अभिनेत्री होण्याचे स्वप्न

सध्या भोजपुरी सिनेइंडस्ट्री चांगलीच पुढे आलेली दिसत आहे. पूर्वी फक्त विशिष्ट राज्यांपुरती मर्यादित असलेली ही इंडस्ट्री आज संपूर्ण देशात गाजत आहे. भोजपुरी, गाणी, सिनेमे, कलाकार यांना मधल्या काही काळापासून मोठी ओळख मिळाली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीचे नाव आले की चर्चा होते ते इथे काम करणाऱ्या अभिनेत्रींबद्दल. भोजपुरी अभिनेत्री या नेहमीच त्यांच्या बोल्ड इमेजमुळे ओळखल्या जातात.

आजच्या काळात भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या अदा आणि ग्लॅमरस लूकने मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट मिळवले आहे. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तुफान गाजणारी अशीच एक अभिनेत्री म्हणजे शुभी शर्मा (Shubhi Sharma). खूप कमी काळात शुभीने या इंडस्ट्रीमध्ये तिची ओळख निर्माण केली आहे. आज (२७ मार्च) शुभी तिचा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

भोजपुरी अभिनेत्री शुभि शर्माचा जन्म २७ मार्चला आजच्याच दिवशी राजस्थानच्या जयपूरमध्ये झाला. तिने तिच्या करिअरच्या सुरूवातीला बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. तिने चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर्स, आयटम सॉंग्स देखील केले. मात्र तिला खास ओळख मिळाली नाही. मग पुढे यश मिळवण्याच्या इच्छेने तिने भोजपुरी इंडस्ट्रीकडे पावले वळवली. शुभीने भोजपुरीमध्ये दिनेश लाल यादव निरहुआ यांच्या ‘चलनी के चालल दुल्हा’ सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिच्या या प्रवासात एक वेळ अशी आली जेव्हा तिला अजिबातच काम मिळत नव्हते, मात्र निरहुआसोबत काम केल्यानंतर तिच्या गाडीने वेग पकडला, आणि तिला मोठमोठ्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.

निरुहआसोबत तिने केलेल्या सिनेमातून तिला सर्वानी नोटीस केले आणि तिची निरूहूआसोबतची जोडी ठरली. त्यानंतर ती पवनसिंगसोबत ‘भइया के साली ओढ़निया वाली’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमामुळे ती रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिने खेसरी लालसोबत ‘छपरा एक्सप्रेस’मध्ये काम केले. शुभीने तिचे शिक्षण जयपूरमधून पूर्ण केले. लहानपणापासूनच तिला एक अभिनेत्री व्हायचे होते. तिने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिले मात्र तिला दरवेळेस निराशा मिळाली.

एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, “माझ्या वडिलांना मी या क्षेत्रात यावे अजिबात मान्य नव्हते. त्यांची इच्छा होती की, मी सरकारी नोकरी करावी. माझ्या अभिनेत्री होण्याच्या स्वप्नाला त्यांनी नेहमीच विरोध केला, मात्र माझी आई माझ्यासोबत उभी राहिली आणि मला पाठिंबा दिला. ज्यामुळे मी आज एका चांगल्या ठिकाणी आहे.” शुभीने राजस्थानी अल्बम असलेल्या ‘लहरिया’मध्ये देखील काम केले आहे. याशिवाय तिने बॉलिवूडच्या ‘वेलकम बॅक’ सिनेमात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा