Saturday, June 21, 2025
Home भोजपूरी रक्षा अन् कल्लूच्या व्हिडिओनं वेधलं सगळ्याचं लक्ष; अभिनेत्री म्हणाली, ‘सइयां के राखब साडी…’

रक्षा अन् कल्लूच्या व्हिडिओनं वेधलं सगळ्याचं लक्ष; अभिनेत्री म्हणाली, ‘सइयां के राखब साडी…’

भोजपुरी सिनेमाची लाेकप्रिय अभिनेत्री रक्षा गुप्ता तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्री ‘कमांडो अर्जुन’मध्ये बोल्डनेस दाखवताना दिसली होती. यानंतर ती राताेरात स्टार झाली. चित्रपटांसोबतच रक्षा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिचे व्हिडिओ आणि फाेटाे कायमच चाहत्यांसाेबत शेअर करत असते. तिचे व्हिडिओ साेशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल हाेतात. अशातच तिने कल्लूसोबतचा एक डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघेही डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये रक्षा गुप्ता (Raksha Gupta) कल्लू (Arvind Akela Kallu)च्या ‘सैयां के रखब सारी में लपेट के'(Saiyan Ke Rakhab Saari Mein Lapet Ke) या गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रक्षा पांढऱ्या साडीमध्ये दिसत आहे, तर अरविंद अकेला कल्लू व्हाइट शर्ट आणि जीन्स या कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. दाेघेही दमदार डान्स करताना आनंदी दिसत आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री अप्रतिम असुन चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. चाहते त्यांच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

व्हि्डिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, “नाही बसंती, असं करू नकोस, तुझ्याशिवाय आम्ही राहू शकणार नाही.” तर दुसऱ्याने लिहिले, “बावल है भैया.” अशाप्रकारे चाहते त्यांच्या या व्हिडिओंवर जोरदार कमेंट करत आहेत. अरविंद अकेला कल्लूने हा व्हिडिओ रक्षा गुप्ताला टॅग करत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांची जोडी लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

याशिवाय कल्लूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ताे नुकताच अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्यासोबत ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्यात दिसला. अभिनेत्याच्या या गाण्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. यासोबतच विजय दशमीच्या मुहूर्तावर कल्लूच्या आगामी ‘राम अबराम’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. कल्लूकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यामध्ये तो काम करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘मिस बिकिनी’ बनलेली अर्चना ‘बिग बॉस’मध्ये लावणार ग्लॅमरचा तडका?

अय्याे! चाहत्याने ठेवला अभिनेत्रीच्या खांद्यावर हात अन् शेहनाज चिडून म्हणाली, ‘मैत्रीण समजला…

हे देखील वाचा