अभिनेत्री अक्षरा सिंग ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करते. अभिनेत्रीने तिच्या टॅलेंटच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. ही अभिनेत्री रीजनल चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री असल्याचे बोलले जाते, तिने यावर्षी डार्लिंग चित्रपटापासून तिची फी वाढवली आहे. सध्या अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत.
अलीकडेच अक्षरा सिंग (akshara singh) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिम ट्रेनरने लादलेल्या निर्बंधांचा उल्लेख करत आहे. अभिनेत्रीने अपलोड केलेला हा मजेशीर व्हिडिओ असला तरी त्यामध्ये ती रागाच्या भरात दिसत आहे. रीलमध्ये अक्षरा सिंग एक ऑडिओ लिप करताना म्हणते, “जिम वाला दादा म्हणतोय, गोड खाणं सोडा, जिमला जा, व्यायाम देखील करा, गाेळ खाणे बंद करा. काही दिवसात तुम्ही म्हणाल की, श्वास घेणे थांबवा. मरुन जाल तर निरोगी रहाल. ते सांगतात की, गाेड खाणं साेडलं नाहीतर तर वजन कमी करता येणार नाही. उगाच चरबी कमी करायची गरज नाही, लाडू खाऊन आनंद मिळतो आणि तेही सोडायचे.” व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या मागे 2 लोक मजेशीर डान्स करतानाही दिसत आहेत.
अक्षरा सिंगचा हा मजेशीर व्हिडिओ जिममध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी जोडलेला आहे, कारण फिटनेस ट्रेनर परफेक्ट शेपसाठी असाच सल्ला देतात. हे शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले , “ट्रेनर असे का म्हणत नाही की, तुम्ही जीवन जगणे थांबवा…” ही रील पाहून काही यूजर्स म्हणत आहेत की, हे खरे आहे पण काही करु शकत नाही.
View this post on Instagram
अभिनेत्रीने 2010 मध्ये रवी किशन विरुद्ध सत्यमेव जयते या ऍक्शन ड्रामामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटांव्यतिरिक्त, अक्षरा पहिल्यांदा 2015 मध्ये ‘काला टीका’ आणि झी टीव्हीच्या ‘सर्विस वाली बहू’या मालिकेत दिसली हाेती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ओटीटी विश्वात ‘अमोल टीव्ही’ची धमाकेदार एन्ट्री संजय पारेकर आणि सचिन पारेकरांच्या अमोल प्रोडक्शनचं नवं पाऊल
अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता मिलिंद गुरव झळकणार रूपेरी पडद्यावर