Saturday, July 6, 2024

रितेश पांडेचे ‘ललकी किरिनिया’ गाण्याचा युट्यूबवर राडा, मिळाले लाखो व्ह्यूज

आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात आणि प्रत्येक सणाचे स्वतःचे असे महत्त्व आहे. नुकतीच आता ४ नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा झाला. हा सण सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत मोठ्या दिमाखात पार पडला. अनेक कलाकारांनी त्यांचे दिवाळीचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. आता दिवाळी संपताच छठची तयारी सुरू झाली आहे. छठपूजेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. छठ माईची गाणी बिहारमध्येच नव्हे, तर पूर्वांचलपर्यंत ऐकायला मिळतात. छठ महापर्वच्या निमित्ताने भोजपुरी इंडस्ट्रीत छठची गाणी आली आहेत. एकापाठोपाठ एक भोजपुरी कलाकार छठी मैयाचे गाणे प्रदर्शित करत आहेत.

रितेश पांडेचे नवीन छठ गाणे झाले प्रदर्शित
अशा परिस्थितीत प्रसिद्ध गायक रितेश पांडे कुठे मागे राहणार आहे. आपल्या अभिनयाने आणि गाण्यांनी लोकांची मने जिंकणाऱ्या रितेश पांडेचे छठ स्पेशल गाणे ‘ललकी किरिनिया’ युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच व्हायरल झाले आहे. या गाण्याला आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

रितेशच्या ‘ललकी किरिनिया’ या छठ गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हे गाणे अतिशय अप्रतिम पद्धतीने शूट करण्यात आले आहे. या गाण्यात महिला पिवळ्या साड्या नेसून छठ माईची पूजा करताना दिसत आहेत. रितेशचे भोजपुरी छठ गाणे २०२१ वेव्ह म्युझिकच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याचे बोल तरुण पांडे यांनी लिहिले असून, छठ हे गाणे रितेश पांडेने गायले आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक डीके यादव आहेत. यापूर्वी त्याचे ‘पान के पत्ता बाटे न पता’ हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाले होते. या गाण्यात रितेश पांडेसोबत अंतरा सिंग आणि प्रियांका देखील दिसल्या होत्या. हे गाणे वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार मीराचा भाऊ? तिची अवस्था पाहून इतर स्पर्धकही भावुक

-राकेशला पाहून जोरजोरात रडू लागली शमिता, व्हिडिओ रिट्विट करत अभिनेत्याच्या पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

-‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार मीराचा भाऊ? तिची अवस्था पाहून इतर स्पर्धकही भावुक

हे देखील वाचा