सुपरस्टार आणि प्रसिद्ध गायक खेसारी लाल यादवला भोजपूरी इंडस्ट्रीतील ‘किंग’ म्हणून ओळखले जाते. खेसारीने २०१२मध्ये ‘माल भेटाई मेला’ हे गाणं गायल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या चित्रपटांना आणि गाण्यांना चाहते चांगलीच पसंती दर्शवत असतात. खेसारीची भोजपूरी धमाकेदार गाणी यूट्यूब आणि सोशल मीडियावर सतत धूमाकूळ घालत असतात. त्याच्या देसी स्टाईलला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. मग ते गाणं असो किंवा भोजपूरी चित्रपटातील अभिनया असो. त्याचवेळी, जेव्हा तो एका चित्रपटात कॉमेडी सीन करताना दिसतो, तेव्हा तो चाहत्यांना वेड लावतो.
खेसारीच्या भोजपुरी गाण्यांप्रमाणेच चाहत्यांना त्याची कॉमेडी देखील खूप आवडते. त्याचे कॉमेडी सीन चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात. खेसारी त्याच्या काॅमेडीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रपटातीला अनेक काॅमेडी सीनला यूट्यूबवर लाखो व्हियूज आणि लाईक्स मिळत असतात. अलीकडेच त्याचा असाच एक विनोदी व्हिडिओ यूट्यूबवर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये खेसारी आपल्या म्हशीसाठी नवरदेवचा शोध घेताना दिसत आहेत. त्यासाठी तो आपली म्हैस सुंदर तयार करतो आणि संपूर्ण गावात फिरतो.
https://youtu.be/NU4yTYqxoM4
शेवटी त्याच्या म्हशीसाठी नवरदेव मिळतो आणि नातेसंबंधही पक्का होतात. हा व्हिडिओ पाहून चाहत्याना हसू अनावर होत आहे. खेसारीचा हा काॅमेडी व्हिडिओ प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. खेसारीच्या या व्हिडिओवर आतापर्यंत ५१ लाखाहून अधिक व्ह्यूज आले आहेत. खेसारी सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो चाहत्यांशी नेहमी गंमतीशीर व्हिडिओ शेअर करतो. तसेच त्याच्या फोटोला चाहते चांगलीच पसंती दर्शवत असतात.
खेसारीचा हा व्हिडिओ त्यांच्या ‘बलम जी आय लव्ह यू’ या चित्रपटातील आहे. त्याचवेळी, खेसारीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. खेसारी लाल यादव, अशोक समर्थ, काजल राघवानी, अक्षरा सिंग, शुभी शर्मा, स्मृती सिन्हा आणि संजय महानंद यांच्याशिवाय या चित्रपटात अनेक कलाकार दिसले होते. खेसारीने ‘साजन चले ससुराल’ या भोजपूरी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…










