Friday, July 5, 2024

सपना चौधरीने कान्सच्या रेड कार्पेटवर केले धमाकेदार पदार्पण; म्हणाली, ‘इंग्रजी न येता इथे पोहोचल्याचा…’

डान्सिंग सेन्सेशन आणि बिग बॉस-फेम सपना चौधरीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर जबरदस्त पदार्पण केले. प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात स्थान मिळविणाऱ्या भारतातील काही प्रादेशिक लोक कलाकारांपैकी  सपना एक आहे. या फेस्टिव्हलमध्ये सपना एअर फ्रान्सच्या मदतीने तिथे पोहोचली.

सपना चाैधरी (sapna chowdhary ) हिने रेट कार्पेटवर आइवरी गाऊनमध्ये कहर केला. खरे तर, अभिनेत्रीसाेबत गायिका असलेल्या सपनाने पॅपराझींना विवध पाेज दिल्या आणि काॅन्फिडेंसमध्ये मीडिया तसेच इतर लाेकांचे अभिवादन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

माध्यमांशी बाेलताना सपना म्हणाली, “कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. रेड कार्पेटवर चालणे हे एक स्वप्न होते. वातावरण पुर्ण पणे इलेक्ट्रिकफाई झाले हाेते आणि जगभरातील इतर अनेक टॅलेंटेड कलाकार तिथे आल्याने मला आनंद झाला.”

सपना चौधरीने सांगितले की, ‘तिला इंग्रजी किंवा फ्रेंच येत नाही, तरीही ती कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गेली.’ ती पुढे म्हणाली की, “कान्स हा केवळ उत्सव नसून कोणत्याही अभिनेत्रीचे आयुष्यभराचे स्वप्न आहे आणि आज मी इंग्रजी किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीय भाषा न जाणता इथपर्यंत पोहोचले याबद्दल मी देवाची आभारी आहे.”

32 वर्षीय सपनाने हरियाणवी लोकगीत आणि तिच्या स्टेज परफॉर्मन्सद्वारे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सपनाच्या व्हिडिओंना यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात. सपना 2016-17मध्ये लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 10 व्या सीझनमध्ये दिसली होती.(bhojpuri dancer sapna chowdhary made a stunning debut on the red carpet of cannes 2023 says i am proud to have reached here without knowing english)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

कान्स फिल्म फेस्टिवलमधील ऐश्वर्याच्या लूकची युजर्सने उडवली खिल्ली, ‘काेई मिल गया’च्या जादूशी केली तुलना

हे देखील वाचा