Sunday, January 26, 2025
Home भोजपूरी ‘रसोडे में कौन था’वर आधारित तयार झालेल्या ‘या’ भोजपुरी गाण्याने इंटरनेटवर केला धमाका

‘रसोडे में कौन था’वर आधारित तयार झालेल्या ‘या’ भोजपुरी गाण्याने इंटरनेटवर केला धमाका

आजच्या सोशल मीडियाच्या काळात कोणत्या गोष्टी हिट होतील आणि काय चर्चेत येईल याचे काही नेम नाही. कोणतंही गोष्टी ट्रेंडिंग मध्ये येते आणि सुपरहिट होतो. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट झालेली मालिका ‘साथ निभाना साथिया’ आजही लोकांना आठवत असेल. सध्या या मालिकेचे दुसरे पर्व सुरू आहे. मात्र पहिल्या पर्वातील एक संवाद काही महिन्यांपासून तुफान गाजत आहे. तो संवाद आहे, ‘रसोडे में कौन था?’. किचनमध्ये जेवण कोण बनवत होते आणि कोणामुळे कुकर फुटला हे या मालिकेतील सासू तिच्या सुनेला विचारते. ऐकताना अतिशय साधा वाटणारा हा संवाद ट्रेंडिंगमध्ये आला काय आणि त्यावर वेगवेगळे मिम्स, रील्स आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

‘रसोडे में कौन था?’ या संवादावर संगीतकार यशराज मुखातेने एक मजेशीर रॅप बनवले आहे. अशातच याची तुफान क्रेझ आणि लोकप्रियता बघता भोजपुरी गायक आणि अभिनेता रितेश पांडे एक गाणे घेऊन आला आहे. गाण्याचे नाव आहे, ‘कौन था.’ हे गाणे ‘रसोडे में कौन था?’ यावर आधारित असून, सध्या हे गाणे तुफान हिट होत आहे. ‘हॅलो कौन’ गाण्यातून रेकॉर्ड तयार करणारा गायक आणि अभिनेता रितेश या गाण्यामुळे प्रचंड गाजत आहे.

रितेश पांडेचे हे भोजपुरी गाणे यशराज मुखातेच्या ‘रसोडे में कौन था’ गणायची साधर्म्य असणारे असले तरी याचे बोल खूपच वेगळे आहे. गाण्याच्या शब्दांमध्ये ‘कौन था’ या शब्दाचा वापर केला गेला आहे. या गाण्यात रितेश सोबत अभिनेत्री आयेशा कश्यप दिसत आहे. गाण्याला प्रदर्शित होताच काही तासात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी रितेश पांडे आणि स्नेहा उपाध्याय यांचे ‘हॅलो कौन’ गाणे देखील खूप गाजले.

या गाण्याचे शब्द विशाल भारतीने लिहिले असून संगीत गोलू गगनने लिहिले आहे. तर गाण्याला रितेश पांडेने स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात त्याचे रॅप लोकांना खूप आवडत आहे, रितेश पांडेचे हे गाणे आशिष यादवने दिग्दर्शित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा