Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘या’ भोजपूरी गाण्याने मोडले अनेक विक्रम

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘या’ भोजपूरी गाण्याने मोडले अनेक विक्रम

सगळ्याच भाषेतील गाण्यांना कायमच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असते. भोजपुरी सिनेमात असे बरेचं गायक आहेत, ज्यांनी आपल्या अद्भुत गाण्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केले. अरविंद अकेला कल्लू, राकेश मिश्रा, प्रमोद प्रेमी यादव, समर सिंह, अंतरा सिंह, प्रियांका इत्यादी भोजपुरी गायकांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. त्यातील एक गायक आहे, जो आपल्या भोजपुरी गाण्यांनी सर्वांना वेड लावत असतो. ‘हॅलो कौन’ फेम गाण्याचा  गायक रितेश पांडे.

अलीकडेच रितेश पांडे यांचे नवीन गाणे यूट्यूबवर चमकत आहे. ‘ना ये दादा ना हो’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे ऋद्धि म्यूजिक वर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलवर ९ एप्रिल रोजी रिलीज झाले होते. या गाण्याने रिलीजबरोबर असा धमाका  उडवला की, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे गाणे अवघ्या एका दिवसात लाखापेक्षा जास्ती वेळा, बघितले गेले आहे.आत्तापर्यंत रितेश पांडे यांच्या या सुपरहिट गाण्याला २१ लाखाहून अधिक व्ह्युज आहेत, आणि ही आकडेवारी वेगाने वाढत आहे.

रितेश पांडे यांच्या ‘ना ए दादा ना हो’ या गाण्यावर रितेश पांडे यांच्यासोबत सुप्रसिद्ध भोजपुरी गायिका शिल्पी राज आहेत. रितेश आणि शिल्पीची जोडी खूप प्रसिद्ध आहे. हे सुपरहिट व्हिडिओ गाणे मांजी मीत यांनी लिहिले आहे, तर आर्या शर्मा यांनी या गाण्याचे संगीत दिले आहे. रितेश पांडे आपल्या भरपुर गाण्यांसाठी प्रसिद्ध असले, तरी रितेशला भोजपुरी सिनेमात रातोरात प्रसिध्द करणारे गाणे म्हणजे ‘हॅलो कौन’ होते. या गाण्यात रितेशच्या सोबत स्नेहा उपाध्याय दिसली होती.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा