Saturday, July 6, 2024

व्हिडिओ: सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि काजल राखवानीचे नवीन गाणे व्हायरल, मिळाले २० लाखांपेक्षा अधिक हिट्स

सध्या भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या जोड्या चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहेत. त्यांची काही गाणी अशी आहेत की, जी रिलीझ होताच सुपरहिट होत आहेत. सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी यांची जोडीही सद्या फारच लोकप्रिय होत आहे.

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी यांचा भोजपुरी चित्रपट ‘लिट्टी चोखा’ यातील ‘६ महीना के लाईका नियन’ या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. यानंतर तो काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

https://youtu.be/Qd1ip7Bur3M

हे खूप सुंदर गाणे असून, त्यात खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी एका वेगळ्याच हटके अंदाजात दिसले आहेत. काजल राघवानी लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. खेसारी लाल यादवचे हे मजेशीर गाणे प्रेक्षकांसाठी एक अद्भुत भेट आहे.

हे गाणे खेसारी लाल यादव आणि अल्का झा यांनी गायले आहे, तर संगीतकार ओम झा, मधुकर आनंद आहेत.

या चित्रपटात सगळीचं गाणी ही एकाहून एक असून, हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. ‘लिट्टी चोखा’ चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला असून, या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे निर्माते प्रदीप के शर्मा आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक पराग पाटील यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवं गाणं, नवा धमाका! खेसारी लाल यादवच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या गाण्यावर पडतोय हिट्सचा पाऊस

-गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदीची कोरोना काळात रस्त्यावरुन जाणाऱ्या एँब्युलन्सवर ह्रदयदावक कविता, ऐका थोडक्यात

-रिमिक्स मोड ऑन! इंग्रजी गाण्यावर डान्स करता करता थेट हिंदी गाण्यावर सनी लिओनीने लावले ठुमके, पाहा हटके व्हिडिओ

क्रिकेटर हार्दिक पंड्याची पत्नी अभिनेत्री नताशाचा धमाकेदार व्हिडीओ पाहिलाय का? पाहा कोणत्या गाण्यावर केलाय डान्स

हे देखील वाचा