Sunday, March 23, 2025
Home भोजपूरी खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

यावर्षी होळीच्या निमित्ताने भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव याची अनेक गाणी रिलीझ झाली. जवळपास ही सर्वच गाणी ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले. आता होळी झाल्यानंतर त्याचे आणखी एक नवीन गाणे रिलीझ झाले आहे, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गाण्याचे नाव ‘मोबाईल कव्हर’ असे आहे. या गाण्यात खेसारी लाल त्याच्या स्टाईल आणि म्युझिकल बीट्सच्या माध्यमातून पंजाबी गायकांनाही स्पर्धा देताना दिसत आहे.

सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या या गाण्यात त्याच्यासोबत शिल्पी राजचाही आवाज आहे. या व्हिडिओमध्ये तो वेगवेगळ्या मुलींसोबत रोमांस करताना दिसत आहेत. अल्बमच्या या व्हिडिओला अतिशय भव्य पद्धतीने शूट करण्यात आले आहे. यात खेसारी नेहमीप्रमाणे खूपच दमदार दिसत आहे, तर त्याच्या सहकारी अभिनेत्रीही काही कमी नाहीत. ‘मोबाइल कव्हर’ गाणे शाम देहाती यांनी लिहिले आहे, तर संगीत विनय विनायक यांचे आहे. हे गाणे यूट्यूब चॅनल स्पीड रेकॉर्ड्स भोजपुरीवर रिलीझ करण्यात आले आहे.

खेसारीच्या या गाण्याची बर्‍याच दिवसांपासून चर्चा होती. कदाचित यामुळेच, रिलीझ होताच गाण्याला अवघ्या 2 तासांतच जवळपास 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यातून अंदाज बांधता येतो की, लवकरच हे गाणेही मिलियन्सच्या क्लबमध्ये सामील होईल. या गाण्याची संकल्पना विवेक सिंग यांची आहे, जे खेसारीचे मॅनेजरही आहेत.

खेसारीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच त्याच्या ‘लिट्टी चोखा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला असून, हा चित्रपट या (एप्रिल) महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो बर्‍याच चित्रपटांचे शूटिंगही करत आहे.

खेसारीलाल यादव हा भोजपुरीचा एक मोठा स्टार आहे, त्याचा चाहता वर्गही खूप मजबूत आहे. कदाचित म्हणूनच त्याचे प्रत्येक गाणे ब्लॉकबस्टर ठरते. आता त्याचे चाहते या गाण्यावरही त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. आतापर्यंत यूट्यूबवर 32 हजार लोकांनी या गाण्याला लाईक केले आहे, तर 16 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. युवराज प्रीतम नावाच्या युजरने लिहिले आहे की, “खेसारी भोजपुरीचा एक ऑलराउंडर कलाकार आहे. तो मनोरंजनाचा एक उत्तम पॅकेज आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तमन्ना भाटियाने वेगळ्याच अंदाजात केला ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावर डान्स, व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘लग्नानंतर काम करणार नाही’, शूटिंगवर परल्यानंतर अनुष्काचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा