कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर मनोरंजन जगताशी निगडित स्टार्सनाही हा चित्रपटाने चांगलेच वेड लावले आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. नुकतीच भोजपुरीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसानेही (Monalisa) चित्रपटातील गाण्यावर केलेला एक धमाकेदार व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंजुलिकाच्या भूमिकेत लोकांना घाबरवत असल्याचे दिसत आहे. कोणता आहे तो व्हिडिओ चला जाणून घेऊ.
मोनालिसा ही भोजपुरी मनोरंजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डलूकने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोनालिसा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या ‘नजर’ या मालिकेच्या लूकमध्ये दिसत आहे आणि ती भिंतीवर चढताना दिसत आहे, जी खूपच भीतीदायक दिसत आहे. इतकंच नाही तर मोनालिसाने त्याच्यासोबत ‘आमी जे तोमर’ हे गाणंही लावल जे तिला आणखीनच भितीदायक बनवत आहे. आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावणाऱ्या मोनालिसाने यावेळी आपल्या स्टाईलने चाहत्यांना घाबरवले आहे.
हा व्हिडिओ शेअर करत मोनालिसाने “आमी जे तोमर, सुधू जे तोमर” असा कॅप्शन दिला आहे. मोनालिसाच्या या व्हिडीओवर फॅन्सही कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले “इतके सुंदर भूत जगात कुठेही सापडणार नाही,” असे सांगितले आहे तर दुसऱ्या एका चाहत्याने “हा व्हिडिओ पाहून घाबरलो” असे म्हणत व्हिडिओचे कौतुक केले आहे.मोनालिसा ही केवळ भोजपुरीच नाही तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘बिग बॉस 10’मध्ये सहभागी झाल्यानंतर मोनालिसाने ‘नजर’, ‘नमक इश्क का’सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. अलीकडेच तिचा पती विक्रांतसोबत ‘स्मार्ट जोडी’मध्ये दिसली होती.










