Friday, July 5, 2024

प्रियांका चोप्राच्या ‘तिनका तिनका’ गाण्यावर मोनालिसाने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहिला का?

भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री मोनालिसाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मोनालिसाने हिंदी चित्रपटांपासून भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. छोट्या पड्यावरील दुनियेतील ती एक चमकता तारा आहे. अभिनयासोबतच मोनालिसा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंडस्ट्रीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. ती तिच्या बोल्ड स्टाईलने लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करते. नुकताच मोनालिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

मोनालिसाने प्रियांका चोप्राच्या ‘करम’ या चित्रपटातील सुपरहिट ‘तिनका तिनका’ गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये मोनालिसा साडी नेसून ठुमके लावताना दिसत आहे. मोनालिसाची ही डान्स स्टाईल पाहून चाहते प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. कमेंट बॉक्समध्ये मोनालिसाचे कौतुक करताना चाहते थकत नाहीयेत.

या व्हिडिओला आतापर्यंत ९४ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १३ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मोनालिसाची कारकीर्द
मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. ती केवळ भोजपुरी चित्रपटातच नाही, तर टीव्हीवरही तिने तिची ओळख बनवली आहे. तिने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच ती ‘बिग बॉस’ची अशी माजी स्पर्धक आहे, जिने या शोमध्ये प्रत्यक्षात लग्न केले होते. या शोमुळे मोनालिसाला घरोघरी ओळख मिळाली.

मोनालिसाने १२५ हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने इतर भाषांमध्ये बंगाली, ओडिया, तमिळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही तिचे अभिनय आणि डान्स कौशल्य दाखवले आहे. मोनालिसा सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. असे असूनही ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करायला विसरत नाही.

‘या’ शोमध्ये मिळाली पसंती
मोनालिसाने बिग बॉसद्वारे हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. ती बिग बॉसची लोकप्रिय स्पर्धक होती. प्रेक्षकांना तिचा नखरा करणारा अंदाज खूप आवडला. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. मोनालिसाने अनेक शोमध्ये काम केले आहे. ती ‘नजर’ शोमध्ये दिसली होती. ज्यात तिचे ‘डायन’चे पात्र चांगलेच पसंत केले गेले. ज्यातून तिला पसंती मिळाली होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मोनालिसा सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा