भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारी अभिनेत्री आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे. तिच्या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सोशल मीडियावरही तिला मोठी फॅन फॉलोविंग आहे. खूपच कमी काळात तिने तिच्या मेहनतीने आणि अभिनयाने या क्षेत्रात तिचे स्थान पक्के केले आहे. नेहमीच आम्रपाली दुबेचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता नुकताच तिचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आम्रपाली दुबेला फॅन्समध्ये स्वतःला घेऊन बज निर्माण करणे आणि स्वतःची क्रेझ टिकवणे खूपच चांगल्या पद्धतीने माहित आहे. ती फॅन्समध्ये स्वतःला प्रकाशझोतात ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. आम्रपालीने इंस्टाग्रामवर ऐक मजेशीर रील शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये आम्रपाली कॅमेऱ्यासमोर भोजपुरी भाषा बोलताना दिसत असून, ती म्हणते, “मी माझ्या नवऱ्याबद्दल कधीही तेवढा विचार करत नाही कारण मला त्याच्यावर तेवढा विश्वास आहे. मी विचार करते तो माझ्या बॉयफ्रेंडचा कारण मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही.

आम्रपाली दुबेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून, तिच्या फॅन्सला देखील तो खूपच आवडत आहे. काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, त्यावर दमदार कमेंट्स देखील येत आहे. आम्रपाली नेहमीच इंस्टाग्रामवर तीचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करताना दिसते. या व्हिडिओ रिल्समुळे तिला मोठ्या प्रमाणावर पब्लिसिटी देखील मिळते. आम्रपाली दुबेने भोजपुरी भाषेसोबतच हिंदीमध्ये देखील काम करताना दिसते. तिने काही हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सात फेरे, मेरा नाम करेगी रोशन, रहना है तेरी पलको की छांव आदी हिंदी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. लवकरच आम्रपाली निरहुआ सोबत ‘आई मिलन की रात’ या सिनेमात दिसणार असून आतापर्यंत या चित्रपटाचे काही गाणे प्रदर्शित झाले आहे आणि ते तुफान गाजत आहे.
हेही वाचा –