Wednesday, October 15, 2025
Home भोजपूरी रवी किशन यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, कुटुंबातील ‘या’ व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

रवी किशन यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, कुटुंबातील ‘या’ व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

गोरखपूरचे भाजप खासदार आणि भोजपुरी मेगास्टार रवी किशन (Ravi Kishan) यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मोठा भाऊ रमेश शुक्ला यांचे बुधवारी (३० मार्च) निधन झाले आहे. असे सांगितले जात आहे की, त्यांचा मोठा भाऊ दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होता आणि आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबासाठी ही अत्यंत दुःखाची वेळ आहे. त्याचवेळी राजकीय वर्तुळापासून ते सर्व मनोरंजन क्षेत्रापर्यंत शोककळा पसरली आहे. त्यांचा मोठा भाऊ ५२ वर्षांचा होता. त्यांच्या गंभीर आजारावर दिल्ली येथील एम्समध्ये उपचार सुरू होते.

रवी किशन यांचे भाऊ (Ravi kishan Brother) यांच्या मोठ्या भावाबाबत सांगितले जात आहे की, रमेश शुक्ला (Ramesh Shukla) यांना काही दिवसांपासून बीपी आणि किडनीचा त्रास होता. यासोबतच त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारानेही ग्रासले होते. आता ते आपल्या आयुष्याशी लढत हरला आहे आणि त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अशा स्थितीत रवी किशन वाराणसीमध्ये त्यांचा भाऊ रमेश किशन शुक्ला यांच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे देखील वृत्तांत सांगितले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर गंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेत्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब महादेवाचे भक्त असल्यामुळे.


रवी किशन आणि त्यांचे कुटुंब आहे जौनपूरचे
रमेश शुक्ला हे तीन भावांपैकी दुसरे होते. एवढ्या लहान वयात त्यांनी जगाचा निरोप घेणे ही कुटुंबासाठी मोठी हानी आहे. खासदार रवी किशन हे जौनपूरच्या केरकट कोटलावी भागातील बिसुई बाराई गावचे रहिवासी आहेत. रवी हे देशातील प्रसिद्ध अभिनेते आणि नेते आहेत. ते सध्या गोरखपूरचे भाजप खासदार आहेत आणि कुटुंबासह मुंबईत राहतात. ते मुंबईत राहत असतील, तरी ते एक ग्राउंड माणूस आहेत. ते अनेकदा त्यांच्या वडिलोपार्जित घरी जातात.

सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशन
सुपरस्टार रवी किशन हे केवळ भोजपुरीतच नाही, तर हिंदी चित्रपट विश्वात देखील त्यांना आज त्यांचा परिचय देण्याची कसलीच गरज नाही. त्यांची ओळख फक्त एक कलाकार म्हणूनच नाही, तर राजकीय नेते म्हणूनही आहे. ते आता भाजप खासदार आहेत. आज त्यांची इतकी प्रतिष्ठा असली, तरी एक काळ असा होता की, त्यांना कोणी ओळखत देखील नव्हते आणि कुटुंबाला आलिशान आयुष्य देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा