Wednesday, July 3, 2024

अंजली भारतीच्या सुरांनी सजले ‘सात फेरों के सात बचन’; गाण्याने अल्पावधीतच मिळवले रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज!

भोजपुरी गाण्यांची क्रेझ सध्या शिगेला पोहचली आहे. दरदिवशी वेगवेगळे भोजपुरी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येतच असतात. विशेष म्हणजे या गाण्यांना रसिकांकडूनही भरभरून प्रेम मिळते. असे भोजपुरी गाणे रिलीझ होताच व्हायरल होतात आणि अनेक विक्रम बनवतात.

नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले ‘सात फेरों के सात बचन’ हे भोजपुरी विवाह गीत बरेच चर्चेत आले आहे. सामाजिक मुद्द्यांना धरून गाणी बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विजय लक्ष्मी म्युझिक कंपनीद्वारे हे नवीन गाणे रिलीझ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रिलीझ झाल्यापासून आतापर्यंत या गाण्याने २३ दशलक्ष व्ह्यूज मिळवून एक नवीन विक्रम नोंदविला आहे. गाण्याला आतापर्यंत तब्बल २,३९,८८,९७६ व्ह्यूज मिळाले आहेत. विशेषकरून लग्नाच्या या सीझनमध्ये, हे गाणे प्रेक्षकांकडून खूप पसंत केले जात आहे. हेच कारण आहे की, या पारंपारिक गाण्याने रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज मिळवले आहेत.

हे एक पारंपरिक गाणे असून, त्याचे सादरीकरण कमालीचे आहे. विजय लक्ष्मी भोजपुरी ट्यूनवर रिलीझ करण्यात आलेल्या या गाण्यात, मुख्य भूमिकेत आनंद मोहन पांडे, नेहा सिद्दीकी, राजेश मिश्रा आणि रूपा सिंग हे कलाकार आहेत. या गाण्याला अंजली भारतीने आवाज दिला असून, बोल अमन अल्बेलाने लिहिले आहे. तसेच याला संगीत लॉर्ड यांनी दिले, तर दिग्दर्शक रणजित कुमार सिंग आहेत. याशिवाय मेकअप आर्टिस्ट जय शर्मा आणि हृतिक हे आहेत.

भोजपुरी विवाह गीत ‘सात फेरों के सात बचन’ यामध्ये, हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार प्रत्येक वचनाचे महत्त्व अगदी सहजपणे सांगितले गेले आहे. या विधीशिवाय हिंदू विवाह अपूर्ण मानला जातो. म्हणूनच सात फेऱ्यांचे सात वचन खूप महत्वाचे आहे, जे प्रेक्षकांना या गाण्याद्वारे सहज समजत आहे. हे या मौल्यवान सात वचन, यापूर्वी कोणत्याही गाण्यात इतक्या सोप्या पद्धतीने दाखवले गेले नव्हते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा