Wednesday, July 3, 2024

व्वा! प्रियंका सिंग- नीलम गिरीचे नवीन गाणे रिलीझ, काही तासातच मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका प्रियंका सिंग आपल्या आवाजाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. तिची अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. तिचे नुकतेच एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘सईयां मिला है लडकईया’ हे गाणे प्रियंकाने गायले आहे. हे गाणे वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी यूट्यूब चॅनलवर रिलीझ केले आहे. या गाण्यामार्फत तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ती जेव्हा केव्हा यूट्यूबवर येते, तेव्हा प्रेक्षकांना तिच्या आवाजाकडे आकर्षित करत असते.

वर्ल्ड वाईड रेकॉर्डस प्रस्तुत प्रियंका सिंगने गायलेले हे गाणे यूट्यूबवर खूपच लोकप्रिय होत आहे. खास गोष्ट म्हणजे हे गाणे नीलम गिरी हिच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात ती खूपच हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. नीलम जेव्हा एखाद्या गाण्यात दिसते, तेव्हा ते गाणे यूट्यूबवर खूपच कमी वेळात प्रसिद्धी मिळवते यात काही शंका नसते. या गाण्याला देखील खूप प्रतिसाद मिळाला आहे. गाणे रिलीझ झाल्यानंतर अगदी काही तासातच या गाण्याला ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘सईयां मिला है लडकईया’ या गाण्याचे लेखन सुमित सिंग चंद्रवंशी यांनी केले आहे. आर्यन शर्मा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. रवी पंडित यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे, तर कोरिओग्राफ रितिक आणि एडिटिंग दीपक पंडित यांनी केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर आता श्रद्धा कपूरही बनली ‘जलपरी!’ शेअर केला अंडरवॉटर व्हिडिओ

-मलायका अरोराची हॉटनेस पुन्हा चर्चेत; स्विमिंग पूलवरील फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा!

-शिमरी स्कर्टमध्ये ‘देसी क्वीन’चा खास अंदाज! वेस्टर्न लूकमध्येही दिसतेय गजब

हे देखील वाचा