भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका शिल्पी राज ही या दिवसात खूप चर्चेत आहे. ती देवरिया उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहे. तिची गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिने खेसारी लाल यादवसोबत देखील अनेक गाणी गायली आहेत. सध्या सोशल मीडियावर या गायिकेचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. खरंतर हा व्हायरल व्हिडिओ तिचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ आहे, ज्यात ती रडताना दिसत आहे.
शिल्पी राज हिचे असे म्हणणे आहे की, 23 मेच्या संध्याकाळी तिच्या भावाच्या टिळक समारंभाच्या दिवशी ती लाईव्ह आली होती. ती म्हणते की, “अनेकजण माझ्या लग्नाच्या अफवा पसरवत आहेत. यूट्यूबवर माझ्या नावाने अनेक व्हिडिओ अपलोड करत आहेत.”
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असे सांगितले आहे की, शिल्पी राजचे आधीच लग्न झाले आहे. शिल्पी राजने या व्हिडिओमध्ये रडत सर्वांना सांगितले की, “हे खोटं आहे. तुम्ही कोणीही याकडे लक्ष देऊ नका. जे चॅनल तिच्या विषयी चुकीच्या बातम्या देत आहेत त्यांना यूट्यूबवर रिपोर्ट केले जाणार आहे.”
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने बातचीत करताना सांगितले की, तिच्या विरोधात काहीतरी कट रचला जात आहे. तिने सांगितले की, “माझा जुना मॅनेजर विवेक पटेलने हे सर्व केले आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यासोबत रिलेशनमध्ये होते. माझ्या सगळ्या गोष्टी तोच मॅनेज करत होता. पैशापासून माझे सगळे शो, सगळे रेकॉर्डिंग तोच सांभाळत होता. परंतु या सोबतच तो मला खूप मारत होता. इतर कोणासोबत मी काम केलेले त्याला आवडत नव्हते. मी त्याच्या कुटुंबाला देखील सपोर्ट करत होते. पैसे वैगेरे काहीही लागले तरी ते मीच देत होते. परंतु तो मला कधीच पैसे परत करत नव्हता. पैशाबद्दल बोलायला गेले की, तो मला टाळत होता. माझे सगळे पैसे त्याच्या अकाऊंटमध्ये येत होते. पण आता काही पैसे माझ्या अकाऊंटमध्ये आले आहेत, त्यामुळे तो मला त्रास देतोय. मी त्याला पैसे देत नाही, त्यामुळे तो सोशल मीडियावर माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…